एकता कपूरच्या ‘नागिन 5’ च्या फर्स्ट लुकची सोशलवर जोरदार चर्चा ! दिसली हिना खानची झलक ? इथं आहे ‘ट्विस्ट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीव्हीच्या दुनियेतील एकता कपूरचा प्रसिद्ध शो नागिनच्या पाचव्या सीजनचा पहिला लुक समोर आल्याचा दावा केला जात आहे. इतकंच नाही तर त्यात हिना खानला पाहिल्याचंही म्हटलं जात आहे. असं असलं तरीही अद्याप एकताच्या बालाजी टेलीफिल्म्स कडून मात्र काहीही अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही.

इंस्टावरून शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नागिन 5 चा हा फर्स्ट लुक असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टरमध्ये दिसत आहे की, जुनी मंदिरं आहेत आणि त्याच्या समोर एक महिला तपस्या करताना दिसत आहे. पाठमोरी आकृती असल्यानं महिला नेमकी कोण आहे हे ओळखू येत नाही. सोशलवर हा फोटो म्हणजे नागिन 5 चा फर्स्ट लुक आहे असं सांगितलं जात आहे.

इंस्टावरून शेअर केलेला हा फोटो म्हणजे मुक्ता ढोंढ हिची इंस्टा स्टोरी आहे. मुक्ता नागिन 4 ची क्रिएटीव्ह डायरेक्टर आहे. त्यामुळं आता चर्चेला उधाण आलं आहे.

सध्या हा कथित नागिन 5 चा फर्स्ट लुक सोशलवर ट्रेंड करताना दिसत आहे. एकता कपूरकडून अद्याप कोणतीही माहिती समोर न आल्यानं आम्ही याची पुष्टी करत नाही. सध्या हा फोटो समोर आल्यानं नागिन मालिकेच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. अनेकजण आता यातील अॅक्ट्रेसबद्दल अंदाज लावताना दिसत आहेत. काहींचं म्हणणं आहे की, यात हिना खान दिसणार आहे तर काहींनी म्हटलंय की, यात दीपिका कक्कर दिसणार आहे.