Bollywood Drugs Case : अखेर NCB च्या रडारवर कशी आली अभिनेत्री भारती सिंह ? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापेमारी केली आहै आणि त्यांचा पुढील तपास सुरूच आहे. अशात एनसीबीच्या टीमनं शनिवारी महिला कॉमेडीयन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांच्या मुंबईतील घरावर छापा मारला. अशी माहिती आहे की, एनसीबीला भारतीच्या घरी गांजा मिळाला आहे. याशिवाय ही एजन्सी अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात छापेमारी करत आहे.

नेमकं प्रकरण काय ?
मीडिया रिपोर्टनुसार ड्रग पेडलर्सकडून मिळालेल्या माहितीनंतर भारती सिंह हिच्या घरावर छापा मारण्यात आला. भारतीच्या घरात गांजा आढळून आला आहे. याचं प्रमाण किती आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. एनसीबीनं भारती सिंह आणि तिच्या पतीला समन्स बजावलं आहे.

असं सांगितलं जात आहे की, ज्यावेळी एनसीबीनं भारतीच्या घरी धाड मारली तेव्हा भारती आणि तिचा पती हे घरात उपस्थित होते.

नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) अ‍ॅक्टर अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्या मुंबई स्थित घरावर छापा मारला होता.

अर्जुनच्या आधीही दीपिका पदुकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan) अशा अभिनेत्रींना एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. अर्जुनचं नावही अनेकदा समोर येताना दिसलं आहे. यानंतर एनसीबीनं या प्रकरणी पहिल्यांदाच अर्जुनवर कारवाई केली.

You might also like