पार्थ समथान आणि खुशाली कुमारची जबरदस्त केमिस्ट्री, पहा व्हिडिओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेचा लोकप्रिय अभिनेता पार्थ समथानचा म्युझिक व्हिडिओ ‘पहले प्यार का पहला गम’ चा टीजर रिलीज झाला आहे. यात पार्थ रोमँटिक अंदाजात दिसत आहे. त्याने चाहत्यांना आवाहन केले कि, त्यांनी गाण्याची रिलीजची प्रतीक्षा करावी. दरम्यान, कसौटी जिंदगी की 2’या मालिकेत पार्थ अनुराग बसू नावाची भूमिका करत होता. ज्याला चाहत्यांनी खुप प्रेम दिले.

यासह पार्थने लिहिले, ‘पहले प्यार का पहला गम’ टीझर रिलीज झाला आहे. टीझरचा आनंद घ्या आणि नव्या प्रेमकथेसाठी सज्ज व्हा.’ हे गाणे 21 जानेवारीला रिलीज होणार आहे. पार्थने चाहत्यांना या म्युझिक व्हिडिओमध्ये आपली प्रतिक्रिया देण्यास सांगितले आहे. पार्थ या गाण्यात एका नवीन अवतारात दिसणार आहे. तो एका सरळ व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत खुशाली कुमारही दिसत आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये प्रेम आणि रोमान्सबद्दल सांगितले गेले आहे.पार्थ आणि खुशालीची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले असून तुलसी कुमार आणि झुबिन नौटियाल यांनी हे गाणे गायले आहे. हे गाणे टी-सीरिजने तयार केले आहे.

पार्थ एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. त्याचा अभिनयास चांगलीच पसंत पडली आहे. तो सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. पार्थची प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. पार्थच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देतात. आता इंस्टाग्रामवर पार्थने ‘ पहले प्यार का पहला गम’ या म्युझिक व्हिडिओचा टीजर शेअर केला आहे.