10 वर्षांचं नातं तुटलं ! पूजा गोरनं सर्वांसमोर केली बॉयफ्रेंड राज सिंह अरोरा सोबत ब्रेकअपची घोषणा

पोलिसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस पूजा गोर (Pooja Gor) गेल्या काही दिवसांपासून आपल्या पर्सनल लाईफमुळं चर्चेत येतान दिसत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पूजा आणि तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंडा राज सिंह अरोरा (Raj Singh Arora) यांचं ब्रेकअप झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. आता या साऱ्यावर खुद्द पूजानं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं तिच्या ब्रेकअपची पुष्टी करत हे सांगितलं आहे की, तिनं आणि राजनं त्यांचे रस्ते वेगळे केले आहेत. सोशलवर पोस्ट शेअर करत अगदी सहजतेनं तिनं तिच्या ब्रेकअपची घोषणा केली आहे.

पूजानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती लिहिते की, 2020 हे अनेक बदलांचं वर्ष राहिलं आहे. जे चांगलं आहे ते तितकं चांगलं नाहीये. काही महिन्यात माझ्या आणि राजच्या नात्याला घेऊन अनेक अंदाज लावले जात आहेत. अनेक अवघड निर्णयांच्या प्रक्रियेला वेळ लागतो. म्हणून याबद्दल बोलण्याआधी काही वेळ मला हवा होता. राज आणि मी आमचे रस्ते वेगळे केले आहेत.

https://www.instagram.com/p/CI2-GXJjQi1/?utm_source=ig_embed

आयुष्यानं जरी आम्हाला वेगळ्या रस्त्यावर नेलं असलं तरी आमच्या दोघांमध्ये जे प्रेम आणि आदर आहे तो आयुष्यभर राहिल. त्याचं कायम भलं व्हावं असं मला वाटेल. तो माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मी त्याची कायम आभारी राहिल. आम्ही कायम मित्र राहू आणि हे कायम राहिल. यावर बोलण्यासाठी मला खूप वेळ घेऊन धाडस एकवटावं लागलं. आता साठी मी एवढंच बोलू इच्छित आहे. समजून घेण्यासाठी आणि आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्यासाठी तुमचे आभार.