जेव्हा पहिल्यांदाच रोमँटीक अंदाजात दिसले होते ‘रामायण’मधील ‘लक्ष्मण’ सुनील लहरी, शेअर केला खास फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रामानंद सागर यांची डीडीवरील रामायण ही मालिका संपली आहे. तरीही मालिकेशी संबंधित अनेक किस्से समोर येताना दिसत आहे. रामायणमधील लक्ष्मण सुनील लहरी सोशल मीडियावर सुपर अॅक्टीव असतात. मालिकेतील अनेक किस्से आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी ते चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत असतात. अलीकडेच सुनील यांनी एक खास फोटो शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे.

सुनील यांनी त्यांच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका सिनेमाचं पोस्टर आहे. फिर आई बरसात या त्यांच्या सिनेमातील हे पोस्टर हे. या सिनेमात त्याच्यासोबत अॅक्ट्रेस नीलम आणि अनिरूद्ध लिड रोलमध्ये होते. सुनील यांचा फिर आई बरसात हा सिनेमा 1985 साली रिलीज झाला होता. सुनील यांचा हा पहिला रोमँटीक सिनेमा होता.

सिनेमाचं पोस्ट शेअर करताना सुनील लहरींनी लिहिलं की, “माझं पहिलं रोमँटीक पोस्टर आणि माझ्या सिनेमातील गाण्यांसाठी LP रेकॉर्ड प्लेअरचं बॅक कव्हर.” पोस्टरमध्ये दिसत आहे की, त्यावर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू मध्ये सिनेमाचं टायटल लिहिलं आहे.