रश्मी देसाईनं शेअर केला Bold अवतार ! चाहते म्हणाले- ‘मिरची…मिरची’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि नागिन 4 फेम अ‍ॅक्ट्रेस रश्मी देसाई (Rashami Desai) सध्या चर्चेत येताना दिसत आहे. याचं कारण आहे रश्मीचे फोटो. अलीकडेच रश्मीचे काही फोटो समोर आले होते ज्यात बोल्ड बिकिनीत दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा आपल्या बोल्डनेसनं तिनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

https://www.instagram.com/p/CIKWC2dgfmv/

रश्मीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालाची हॉट अँड बोल्ड दिसत आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं शमरी रोज गोल्ड पँट आणि ब्लॅक क्रॉप टॉप घातला आहे. आपल्या लुकला रश्मीनं बोल्डनेसचा तडका दिला आहे. केस मोकळे सोडलेली रश्मी खूपच सुंदर दिसत आहे. रश्मीनं फोटोशुट करताना सिजलिंग पोज दिल्या आहेत.

रश्मीचा हा बोल्ड अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सोशलवर रश्मीची मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिला लाखो लोक इंस्टावर फॉलो करतात.

रश्मीनं फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ब्लॅक मिरचीची इमोजी वापरली आहे. यामुळं अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करताना मिरची मिरची असं म्हणत कमेंट केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CHmiKtEgeVK/

रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नागिन 4 मालिकेत काम केलं आहे. यात ती शलाकाची भूमिका साकारत होती. रश्मीनं जास्मीन भसीनली रिप्लेस केलं होतं. रश्मी बिग बॉस 13 मध्येही झळकली आहे.

https://www.instagram.com/p/CG4CTDGArHs/

https://www.instagram.com/p/CGb2m4ogrvy/

https://www.instagram.com/p/CGMIDmZguao/

https://www.instagram.com/p/CFymSxSgv2x/

https://www.instagram.com/p/CFjQq-hg8ud/