तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी महागलं TV-फ्रिज, नाही मिळत आता डिस्काऊंट, चीन आहे मूळ कारण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीनच्या सीमेवर वाढणार्‍या तणावाचा परिणाम आता भारतीय बाजारावर दिसून येत आहे. एकीकडे चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीय बाजारपेठेत मोबाइल, टॅब्लेट, टीव्ही, फ्रिज या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उपलब्धतेवरही परिणाम होत आहे.

सीमाशुल्क विभागाने चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तूंची चौकशी सुरू केली आहे, त्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. हेच कारण आहे की, बहुतेक कंपन्यांनी या उत्पादनांच्या किंमतींमध्ये १२ टक्क्यांनी वाढ केली आहे.

नवीन लॉन्चिंगमध्ये उशीर होण्याची शक्यता
या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुरवठा थांबल्याने काही कंपन्यांनी त्यावर सूट देणे देखील बंद केले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी हेही त्याचे एक कारण आहे. त्याचबरोबर आता सांगितले जात आहे की, नवीन मोबाइल हँडसेट आणि टीव्ही इ. लाँच होण्यास उशीर होऊ शकतो.

८० टक्के इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आयात करतो भारत
भारतात ८० टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात केली जाते. भारताला डिस्प्ले पॅनेल्स, प्रिंटेड सर्किट बोर्डासाठी पूर्णपणे चीनच्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत चिनी वस्तूंची आयात बंद केल्याने देशांतर्गत उद्योगावर परिणाम होत आहे.

स्मार्टफोनच्या मागणीमध्ये वाढ
अलीकडेच चीनी स्मार्टफोन कंपनीने एक स्मार्टफोन ऑनलाइन लॉन्च केला होता. या फोनचा स्टॉक काही सेकंदातच संपला असा दावा शाओमी इंडियाचे प्रमुख मनु जैन यांनी केला होता. काही कंपन्या भारतात खप पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आयातीची मदत घेत आहेत. विशेषत: स्मार्टफोन विभागात, कारण भारतातील त्यांच्या सुविधेचे काम पूर्णपणे सुरु झालेले नाही.