Rekha TV Debut : आता टीव्ही स्क्रीनवर होणार रेखाचा डेब्यू, ‘या’ सिरीयलमध्ये दिसणार अभिनेत्री, पाहा व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन- चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा ही आता लवकरच टीव्ही मालिकेत दिसणार असल्याची चर्चा चालू आहे. रेखा यांनी मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आपल्या अभिनयातून कितीतरी चित्रपट त्यांनी हिट दिलेले आहेत. परंतु गेली कित्येक वर्षे हिट चित्रपट दिलेली रेखा आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

 

रेखा चा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रेखा गाणं गाताना दिसत आहे. विरल भयाणी यांनी हा प्रोमो चा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा प्रोमो स्टार प्लस वरील ‘गुम है किसीं के प्यार में’ या सिरीयल चा आहे. यात रेखा या गाणे गायले आहे व त्या गाण्याबद्दल तसेच सिरीयल बद्दल माहिती सांगत आहेत. आणि ही सिरीयल माझ्यासाठी खूप हृदयस्पर्शी आहे असेही त्या म्हणाल्या.

ही सिरीयल सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता असणार आहे. या सिरीयल मध्ये रेखा काही विशेष भागासाठी काम करत आहेत का पूर्ण सिरीयल मध्ये असणार व त्या कोणत्या भूमिकेत असणार हे स्पष्ट झालेले नाही. पण हे लवकरच प्रेक्षकांच्या समोर येईल.