अभिनेत्री रेणुका शहाणेनं TV अ‍ॅक्ट्रेससाठी मागितली आर्थिक मदत, आजारी आईला हॉस्पिटलला नेण्यासाठीदेखील पैसे नाहीत !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीव्ही अ‍ॅक्ट्रेस नुपूर अलंकार हिच्या आईची तब्येत खूप खराब झाली आहे. आईच्या उपचारासाठी नुपूरकडे पैसे नाहीत. अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं सोशलवरून एक पोस्ट शेअर करत नुपूरची मदत करण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे. तिनं सोबत नुपूरच्या आईचे अकाऊंट डिटेल्सही दिले आहेत.

रेणुकानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, “माझी एक चागंली मैत्रीण नुपूर अलंकार सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. दुर्दैवानं तिचे सर्व पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत. नुपूर अॅक्टींग व्यतिरीक्त आल्टरनेट थेरपीच्या माध्यमातून कमाई करत होती आणि आपल्या आईवर उपचार करत होती. परंतु लॉकडाऊनमुळं तिचं काम बंद पडलं. तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. यासाठी खूप खर्चाची तयारी आवश्यक आहे. मी तिच्या आईचे अकाऊंट डिटेल्स शेअर करत आहे. शक्य असेल तेवढं दान नक्की करा. विश्वास ठेवा नुपूर तोपर्यंत मदत नाही जोपर्यंत ती खूप मजबूर आहे.”

नुपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं स्वरागिनी, तंत्र आणि इस प्यार को क्या नाम दू अशा अनेक मालिकेत काम केलं आहे.