Video : पाय घसरून स्विमिंग पूलमध्ये पडली रूबीना दिलैक ! क्षणातच अली गोनीनं घेतली तिला वाचवायला उडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात रोज काही ना काही ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. अलीकडेच एका टास्कच्या वेळी अली गोनी आणि अभिनव शुक्ला यांच्यातही वाद होताना दिसला होता. दोघात खूप जास्त भांडण झालं. नंतर या भांडणाचा परिणाम हा रूबीना आणि अभिनव यांच्या नात्यावर होताना दिसला. अभिनव यामुळं रूबीनावर नाराज झाला की, ती अली सोबत बोलत आहे. जसे हे स्पर्धक एकमेकांसोबत भांडत असतात तसे एकमेकांना मदतही करत असतात. असंच काहीसं आगामी एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे. एका सीनमध्ये रूबीना पाय घसरून स्विमिंग पूलमध्ये पडते, तेव्हा अली गोनी लगेच तिच्यासाठी पाण्यात उडी घेतो. याचा एक प्रोमो व्हिडीओ देखील समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.

प्रोमो व्हिडीओत दिसत आहे की, एक टास्क पूर्ण करतेवेळी रूबीना दिलैक बिग बॉसच्या निर्देशानंतर स्विमिंग पूलमध्ये उडी मारते. बिग बॉसनं अचाकन दिलेल्या टास्कमुळं रूबीनाला असं करावं लागतं. तिला स्विमिंग पूलमध्ये पडताना पाहताच अली गोनी आणि विकास गुप्ता ओरडतात आणि पुढच्याच क्षणी ते रूबीनासाठी पाण्यात उडी मारतात.

मीडिया रिपोर्टनुसार आता या वीकेंडला डबल एविक्शनमध्ये ॲक्ट्रेस देवोलिना भट्टाचार्य घरातून बाहेर होण्याची शक्यता आहे. देवोलिना घरात एजाज खानची प्रॉक्सी बनून आली आहे. या वीकेंडच्या घरातून बाहेर होण्याच्या नॉमिनेशन लिस्टमध्ये देवोलिनाचंही नाव आहे. इतकंच नाही तर तिच्यासोबतच राहुल वैद्य, निक्की तंबोली आणि विकास गुप्ता यांच्याही नावाचा समावेश आहे.