Birthday SPL : ‘द्रोपदी’चा वेदनादायी सीन करताना ‘ढसा ढसा’ रडली होती रूपा गांगुली ! शांत करायला लागला जवळपास 1 तास

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   महाभारत (Mahabharat) मालिकेतील भीष्म पितामह, दुर्योधन, कर्ण, शकुनी मामा सोबतच असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांच्या मनात खास जागा तयार केली आहे. यापैकीच एक आहे रूपा गांगुली. रूपा गांगुली (Roopa Ganguly) आज तिचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. महाभारत मालिकेत रूपानं द्रौपदीची भूमिका साकारली होती. यासाठी तिनं खूप मेहनत घेतली होती. आज वाढदिवसानिमित्त असाच एक किस्सा आपण जाणून घेणार आहे जो आहे द्रौपदी वस्त्रहरणाचा.

रूपानं 1988 मध्ये बीआर चोपडा (B. R. Chopra) यांच्या महाभारतमध्ये द्रौपदीचा रोल केला होता. या भूमिकेत तिनं एवढा जीव ओतला होता की, एक सीन करताना ती खरोखरंच ढसाढसा रडली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेच्या शूटिंगची आठवण सांगताना मेकर्स सांगतात की, शूटिंगच्या आधी बी. आर. चोपडा यांनी रूपा गांगुलीला बोलावलं आणि तिला सांगितलं की, भर सभेत जर एखाद्या महिलेचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न झाला तर तिची हालत काय होईल. अशा मूडमध्ये तू स्वत:ला आण.

कोणालाच वाटलं नव्हतं की, एकाच टेकमध्ये हा सीन शूट केला जाईल. द्रौपदीनं खूपच वास्तविक आणि ताकदीचा सीन दिला तेही एकाच टेकमध्ये. द्रौपदी चीर हरणाचा सीक्वेंस एवढा वेदनादायी होता की, तो करताना रूप गांगुली खरोखर ढसा ढसा रडू लागली होती. ती इतकं रडली होती की, मेकर्स आणि स्टार कास्टला तिला शांत करण्यासाठी वेळ लागला होता. जवळपास तासाभरानंतर रूपा शांत झाली होती.

रूपाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 1992 साली आलेल्या एका तेलगू सिनेमातून तिनं फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. यानंतर ती इंस्पेक्टर भवानी सिनेमात दिसली. याशिवाय तिनं गोलमाल, अर्शीनगर, बहार आने तक अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. ती एक चांगली सिंगरही आहे.

 

You might also like