Bigg Boss 14 TRP Ratings : टीआरपी चार्टमध्ये सलमान खानचा शो बिग बॉस 14 ची स्थिती वाईट, पोहचला नाही टॉप फाइव्हमध्ये

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीआरपी रेटिंगनुसार बिग बॉस 14 अजूनपर्यंत टॉप 5 मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. तर टीव्ही कलाकार रूपाली गांगुली अभिनीत शो ’अनुपमा’ नंबर वनच्या पोझीशनवर पोहचला आहे. बिग बॉस 14 जेव्हापासून सुरू झाला आहे. तेव्हापासून त्याचा टीआरपी वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शो चे स्पर्धक लोकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक प्रकार करत आहेत.

मात्र, यानंतर सुद्धा हा शो टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. या आठवड्यात जारी टीआरपी चार्टमध्ये बिग बॉसचे नॉमीनेशन नाही. बिग बॉस 14 सलमान खान होस्ट करत आहे आणि यास आतापर्यंत चांगला टीआरपी मिळालेला नाही.

अलिकडच्या एका रिपोर्टनुसार, ’अनुपमा’ पहिल्या नंबरवर कायम आहे. तर दुसर्‍या स्थानावर ’कुंडली भाग्य’ आहे. तर तिसर्‍या स्थानावर ’कुमकुम भाग्य’ मालिका आणि चौथ्या स्थानावर ’छोटी सरदारनी’ आहे. तसेच पाचव्या स्थानावर ’तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका आहे. बिग बॉस 14 च्या स्पर्धकांना पुढे जाण्यासाठी खुप मेहनत करावी लागणार आहे. कारण यातील सीनियर्स सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान शो च्या बाहेर गेले आहेत.

आता या शोचा टीआरपी वाढवण्यासाठी कोणती रणनिती वापरली जाते, हे पहाण्यासारखे असेल. शो मध्ये अनेक वाइल्ड कार्ड एंट्री सुद्धा दिल्या जाऊ शकतात. परंतु, यामुळे टीआरपी वाढेल का, हे येत्या काळातच समजू शकते. शोमधून आतापर्यंत सारा गुरपाल आणि शहजाद देओल बाहेर गेले आहेत. याशिवाय एजाज खान आणि पवित्रा पूनिया धोक्यात आहेत आणि ते कधीही शोच्या बाहेर जाऊ शकतात.

You might also like