‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ च्या वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियरवर अभिनेता शरद केळकरनं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

डायरेक्टर ओम राऊतचा तान्हाजी द अनसिंग वॉरियर सिनेमाचा वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर रविवारी (26 जुलै 2020) रात्री 8 वाजता होणार आहे. सिनेमात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान प्रमुख भूमिकेत आहेत. शरद केळकर यानं सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. शरदनंही चाहत्यांना सिनेमा पाहण्यासाठी अपील केलं आहे.

शरद केळकर म्हणतो, “छत्रपती शिवाजी महाराज भारतातील महान योद्धा आणि राजांपैकी एक होते. मी लहानपणापासून त्यांच्या जीवन प्रवासाच्या गाथा वाचल्या आहेत. जेव्हा मला या सिनेमासाठी विचारण्यात आलं तेव्हा हे माझ्यासाठी एका स्वप्नासारखं आहे. पडद्यावर महाराज साकारणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. आतापर्यंत सर्व अनुभवानं मला नम्र बनवलं आहे.”

पुढे शरद म्हणतो, “छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत सर्वांसाठी उपयोगी आहेत आणि आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. त्यांचा संदेश सरळ आहे. कोणत्याही काळात याचा उपयोग होऊ शकतो. मला वाटतं लोकांनी एकत्र मिळून तान्हाजींचं प्रेरणादायी नेतृत्व आणि भाग्य 26 जुलै 2020 रोजी रात्री 8 वाजता पहायला हवं.

https://www.instagram.com/p/B5CqjAKh8vW/

तान्हाजी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमानं कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड्स तोडले होते. हा सिनेमा खूपच गाजला आहे.