सिद्धार्थ शुक्लाबद्दल भावना मांडताना ‘ढसा-ढसा’ रडली शहनाज गिल, म्हणाली- ‘मी त्याला जास्त…’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बिग बॉस 13 मध्ये शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी खूपच चर्चेत राहिली होती. बिग बॉस संपल्यानंतरही शहनाज आणि सिद्धार्थ यांनी अटेंशन घेतलं. या शोनंतर शहनाज गिल आणि पारस छाबडा मुझसे शादी करोगे या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसत आहेत. अलीकडेच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात शहनाज गिल सिद्धार्थ शुक्लाबद्दल आपल्या भावना मांडत आहे. यावेळी अचानक तिला रडू कोसळतं. सध्या शहनाजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, शहनाज गिल जय भानुशालीला आपल्या भावना सांगत आहे. शहनाज म्हणते, “मी या शोला शोच समजत होते. मला वाटलं लोक येतील मला पँपर करतील. मला चांगलं वाटेल. परंतु मला नव्हतं वाटलं या गोष्टी माझ्यावर भारी पडतील. मी कोणाला तरी जास्त फील करायला लागले आहे. मला वाटतं की, प्रेमात पडले आहे.”

जय तिला विचारतो की, तू कोणाच्या प्रेमात पडली आहेस. यावर शहनाज म्हणते, सिद्धार्थच्या. सिद्धार्थनं कधी त्याच्या भावना सांगितल्या का असं जयनं विचारल्यानंतर शहनाज म्हणते, “तो नाही बोलणार. जर त्याच्या मनात असेलही तरी तो बोलणार नाही. त्याला मी गाढव वाटत असले तरीही माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे.” हे सगळं बोलताना शहनाज ढसाढसा रडू लागली.