‘या’ 8 टीव्ही मालिका वर्षभरही चालल्या नाहीत, खूप चर्चेत राहूनही ‘TRP’ फेल झाल्याने ‘बंद’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीवर अनेक मालिका सुरु होतात बंद होतात. काही मालिका वर्षानुवर्षे सुरु आहेत. काही मालिका अशा आहेत ज्या एक वर्षही चालल्या नाहीत. गेल्या काही महिन्यात कमी टीआरपी मुळे अनेक मालिका बंद झाल्या आहेत, काही होणार आहेत. हैराण करणारी बाब अशी की, या मालिकांनी लाँच होण्याआधी खूप पब्लिसिटी मिळवली परंतु टेलीकास्ट झाल्यानंतर यांचा काहीच पत्ता दिसला नाही. अशाच मालिकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आधी जबरदस्त चर्चेत आल्या परंतु वर्षभरही चालल्या नाहीत.
1 साल भी नहीं चले ये शो, जबरदस्त चर्चा के बावजूद TRP में फेल, हुए बंद
१) एक भ्रम… सुवर्णयुग संपन्न
२२ एप्रिल २०१९ रोजी लाँच झालेली मालिका एक भ्रम… सुर्वणयुग संपन्न बंद होणार आहे. श्रेनु पारिख आणि जैन इमाम स्टारर या मालिकेचा शेवटचा एपिसोड १४ सप्टेबंर २०१९ रोजी टेलीकास्ट होणार आहे. प्रतिसाद न मिळाल्याने हा शो ५ महिन्यातच बंद होणार आहे.

1 साल भी नहीं चले ये शो, जबरदस्त चर्चा के बावजूद TRP में फेल, हुए बंद
२) दिल तो हैप्पी है जी
याच वर्षी १५ जानेवारी रोजी लाँच झालेला हा शो बंद करण्यासाठी अचानक निर्णय घेण्यात आला आहे. शोचा शेवटचा एपिसोड ९ ऑगस्ट रोजी टेलीकास्ट झाला होता. स्टारकास्टही हे ऐकून हैराण आहेत.
1 साल भी नहीं चले ये शो, जबरदस्त चर्चा के बावजूद TRP में फेल, हुए बंद
३) केसरी नंदन
ही मालिका दंगल सिनेमाला प्रेरीत असून खूप जोशात लाँच झाली होती. परंतु टीआरपी न मिळाल्याने हा शो वर्षभरही चालला नाही. १ जानेवारी २०१९ रोजी लाँच झालेली ही मालिका २६ जुलै रोजी बंद झाली आहे.
1 साल भी नहीं चले ये शो, जबरदस्त चर्चा के बावजूद TRP में फेल, हुए बंद
४) विष या अमृत : सितारा
अदा खानची मालिका विष या अमृत : सितारा मागील वर्षी ३ डिसेंबर रोजी लाँच झाली होती. परंतु कमजोर स्टोरी आणि घटत्या टीआरपीमुळे ही मालिका ७ जून २०१९ रोजी बंद करण्यात आली.
1 साल भी नहीं चले ये शो, जबरदस्त चर्चा के बावजूद TRP में फेल, हुए बंद
५) झांसी की रानी
राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत मालिका झांसी की रानी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच झाली होती. कमी टीआरपी असल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. जुलैमध्ये ही मालिका ऑफएअर करण्यात आलीत.
1 साल भी नहीं चले ये शो, जबरदस्त चर्चा के बावजूद TRP में फेल, हुए बंद
६) हर साख पर उल्लू बैठा है
स्टार प्लस वरील मालिका हर साख पर उल्लू बैठा है मध्ये राजकारणातील डावपेच कॉमेडी पद्धतीने दाखवले होते. परंतु प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास असमर्थ ठरल्याने अवघ्या ७ महिन्यात ही मालिका बंद करण्यात आली.
1 साल भी नहीं चले ये शो, जबरदस्त चर्चा के बावजूद TRP में फेल, हुए बंद
७) दास्तां ए मोहब्बत- सलीम अनारकली
सलीम-अनारकलीच्या अमर प्रेम कहानीमध्ये शाहिर शेख आणि सोनारिका भदोरिया लीड रोलमध्ये होते. धमाकेदार प्रमोशन आणि भव्य सेट असूनही ही मालिका हिट झाली नाही. आळशी कहानीमुळे शोचा टीआरपी कमी झाला. मागील वर्षी १ ऑक्टोबर रोजी ही मालिका लाँच झाली होती. ४ जानेवारी २०१९ रोजी ही मालिका बंद झाली होती.
1 साल भी नहीं चले ये शो, जबरदस्त चर्चा के बावजूद TRP में फेल, हुए बंद
८) लाडो
लाडो मालिकेचा पहिला सीजन खूपच हिट झाला होता. परंतु दुसरा सीजन मात्र सपशेल फ्लॉप झाला. शोची स्टोरी प्रेक्षकांना आवडली नाही. अम्माजीचा रोलही संपवला गेला. यानंतर मेघना मलिकने ही मालिका सोडली. टीआरपी पडल्याने ७ महिन्यात ही मालिका बंद झाली.

आरोग्यविषयक वृत्त –