बेबो करीनाबद्दल ‘असे’ बोलल्यामुळे ‘या’ अभिनेत्याच्या ‘कानशिलात’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – या दिवसांमध्ये टीव्हीवर रिऍलिटी शो चा काळ चालू आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध डान्स शो ‘डांस इंडिया डांस’ चे सातवे सिजन लवकरच चालू होणार आहे. या शोच्या पहिल्याच हफ्त्यामध्ये जबरदस्त ड्रामा बघायला भेटणार आहे. शो लॉन्च झाल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीति चोपड़ा आपला चित्रपट ‘जबरिया जोड़ी’ च्या प्रमोशनसाठी येणार आहेत. हे दोघे सुपरस्टार होस्ट करण वाहीसोबत मस्ती करतांना दिसून येतील. आणि त्याची झलक नुकतीच रिलीज झालेल्या प्रोमो मध्ये दाखवली गेली. या प्रोमोमध्ये सिद्धार्थने, कारण वाहीच्या कानशिलात लगावली आहे. कानशिलात लावण्याचे कारण खूप मजेशीर आहे.

‘डांस इंडिया डांस’ च्या सेटवर पोहचलेले सिद्धार्थ आणि परिणीतिने करणला बंदी बनवून त्याचे जबरदस्तीने लग्न करायचे ठरवले. यावर कारणने सांगितले की, त्याच्या नजरेत एक मुलगी आहे. परंतु तिचा पती ऐकत नाहीये. त्यावेळी सिद्धार्थने विचारले त्याचे नाव काय आहे. आम्ही त्याला देखील उचलून घेऊ. मग करणने तिच्या पतीचे नाव सांगितले की, सैफ अली खान. करणचे बोलणे ऐकून सर्वांना धक्का बसला. तेव्हा सिद्धार्थने करणला हसत-हसत कानशिलात लगावली. या व्यतिरिक्त या प्रोमोमध्ये ‘डांस इंडिया डांस 7’ च्या सेटवर सिद्धार्थ मल्होत्रासोबत करीना कपूर जबरदस्त डान्स करतांना दिसते आहे. करीनाने सिद्धार्थचा चित्रपट ब्रदर्स मध्ये आइटम नंबर केले होते. या आइटम नंबरवर तिने ‘डांस इंडिया डांस 7’ च्या सेटवर परफॉर्म केला.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like