सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलनं गुपचूप उरकलं लग्न ? व्हायरल फोटोमुळं जोरदार चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विनर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) ही जोडी कायमच चर्चेत असते. दोघांच्या नात्याबद्दलही अनेकदा खूप बोललं जाताना दिसतं. शहनाजनं अनेकदा सिद्दार्थ वरील प्रेम व्यक्त केलं आहे. परंतु सिद्धार्थ कडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. रिपोर्टमध्ये अनेकदा दोघांच्या अफेअरचाही उल्लेख करण्यात आला आहे. परंतु दोघांनीही त्यांच्या नात्यावर अद्याप शिक्कामोर्तब केलेलं नाही.

अशात आता सिद्धार्थ आणि शहनाज यांचा एक फोटो समोर आला आहे जो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोत असं काही दिसत आहे, ज्यानंतर आता असा अंदाज लावला जात आहे की, दोघांनी गुपचूप लग्न तर उरकलं नाही ना.

फोटोत दिसत आहे की, शहनाजच्या भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. फोटोत दोघंही सोबत दिसत आहे. सध्या या फोटोची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न पडला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हा फोटो खरा नसून एक फॅन मेड फोटो आहे. परंतु हा फोटो समोर आल्यानंतर सर्व हेच विचारत आहेत की, दोघांनी लग्न केलं आहे का. चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. अनेकांनी म्हटलं आहे की, त्यांनी जर लग्न केलं असेल तर चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.