Birthday SPL : ‘सून’ म्हणून हिट परंतु ‘या’ मालिकेत लोकांनी नाकरालं, अ‍ॅक्टींग येत नाही म्हणून झाल्या होत्या ‘Reject’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महिला व बालविकास मंत्री तसेच टेक्स्टाईल मंत्री आणि एक अभिनेत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी अभिनयात तर स्वत:ला सिद्ध केलंच परंतु राजकारणातही त्यांचं नाणं खणाणलं आहे. आज त्या आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 23 मार्च 1976 रोजी झाला आहे. आज त्यांच्या बद्दल काही रोचक गोष्टी त्यांचा संघर्ष आपण जाणून घेणार आहोत.

एकता कपूरची मालिका क्योंकि सास भी कभू बहू थी या मालिकेत स्मृती इराणी यांनी आदर्शन सून तुलसी वीरानीची भूमिका साकारली होती. हा शो लोकांना एवढा आवडतो की, आजही तो शो लोकांच्या स्मरणात आहे आणि त्यांचा फेवरेट आहे. या मालिकेनंतर इराणी यांनी आणखी एका मालिकेत काम करत कॉमेडीत हात आजमावला होता. मनीबेन डॉट कॉम असं या मालिकेचं नाव आहे. परंतु हा शो क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेच्या तुलनेत आणि लोकप्रियेतच्या बाबतीत कुठेच नव्हता.

या मालिकेत लोकांनी त्यांना केलं रिजेक्ट

या शोकडून मेकर्सला खूप आशा होत्या. टीव्हीच्या सर्वात फेवरेट सुनेला कॉमेडी अंदाजात मात्र लोकांनी रिजेक्ट केलं. क्योंकि सास भी… या मालिकेसाठी स्मृती इराणी यांना 5 इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स, 4 इंडियन टेली अवॉर्ड्स आणि 8 स्टार परिवार अवॉर्ड्स मिळाले आहेत. याआधी त्यांनी आतिश आणि हम है कल आज और कल या मालिकेतही काम केलं होतं.

अ‍ॅक्टींग येत नाही म्हणून झाल्या होत्या रिजेक्ट

स्मृती इराणी यांनी 1998 मध्ये मिस इंडिया पेजेंटमध्ये भाग घेतला होता. या शोच्या फायनलिस्टमध्ये त्यांनी स्थान मिळवलं होतं. पैशांसाठी त्यांनी नोकरी शोधली होती. त्यांनी एका अ‍ॅड एजन्सीमध्ये ऑडिशनही दिलं होतं. परंतु अ‍ॅक्टींग येत नाही असं सांगत त्यांना रिजेक्ट करण्यात आलं होतं. मजबूरीत त्यांनी एका महिन्यासाठी वेट्रेसचा जॉबही केला आहे. मोठ्या मुश्किलीनं त्यांना मिका सिंगचे अल्बम सावन में लग गई आग आणि बोलियां मध्ये काम मिळालं होतं. 2002 साली त्यांनी लहान पडद्यावर पाऊल टाकलं होतं.