‘तारक मेहता…’ मधील ‘बबीता’ मुनमुननं केलंय ‘किंग’ खानसोबत काम ! व्हायरल होतोय व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका चाहत्यांमध्ये खूपच फेमस आहे. यातील जेठा लालची जान म्हणजेच बबीता देखील सर्वांना आवडते. ही भूमिका साकारली आहे ती म्हणजे मुनमुन दत्ता या अभिनेत्रीनं. जेठा लाल कायमच तिच्यासोबत फ्लर्ट करताना दिसत असतात. तुम्हाला माहिती आहे का याच बबीतानं कधी काळी बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबतही काम केलं आहे.

मुनमुन दत्ता हिनं तारक मेहता मध्ये काम करण्याआधी किंग खान सोबत एका जाहिरातीत काम केलं आहे. यात शाहरुख खाननं एका रुग्णाची भूमिका साकारली होती तर मुनमुन हिनं एका नर्सची भूमिका साकारली होती. यात दिसतं की शाहरुखच्या पायाला प्लॅस्टर आहे आणि मुनमुन त्यावर काही तरी लिहित आहे, कदाचित साईन करत आहे.

ही एका पेनाची जाहिरात आहे. सध्या या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सध्या बबीताच्या म्हणजेच मुनमुनच्या या व्हिडीओची खूप चर्चा होताना दिसत आहे. अनेक चाहते असे आहेत ज्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. ही गोष्ट जाणून घेतल्यानंतर आता चाहतेही खुश झाले आहेत.