Tarak Mehata Ka ulata Chasma मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तारक मेहता का उलटा चष्मा (Tarak Mehata Ka ulata Chasma) या प्रसिद्ध मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांना कोरोनाची (Corona virus) लागण झाली आहे. खुद्द त्यांनीच सोशलवरून ही माहिती दिली आहे. कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना टेस्ट करण्याचं आावहनदेखील त्यांनी केलं आहे.

असित कुमार मोदी यांनी ट्विट करत लिहिलं की, जेव्हा मला कोरोनाची लक्षणं जाणवली तेव्हा मी टेस्ट केली. माझी टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी काळजी घ्या आणि प्रोटोकॉलचं पालन करा. माझी काळजी करू नका. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वादानं मी लवकरच बरा होईल. तुम्ही मस्त आणि निरोगी राहा.

सध्या असित यांचं ट्विट सोशलवर व्हायरल होत आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मालिकेचे चाहते आता ते लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनेकांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे.

अलीकडेच दबंग 3 चे प्रोड्युसर निखिल द्विवेदी (Nikhil Dwivedi) आणि तेलगू सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं.

You might also like