ही बाईक घरी घेऊन ‘या’ 1555 रुपयांच्या EMI वर, आहे सर्वात जास्त मायलेज

नवी दिल्ली : TVS स्पोर्ट भारताची सर्वात जास्त मायलेज देणारी बाईक आहे. नुकतेच या बाईकने ऑन-रोड 110.12 केएमपीएल मायलेजसह नवा रेकॉर्ड केला आहे. आता या फेस्टिव्ह सीझनमध्ये कंपनी या बाईकवर शानदार ऑफर देत आहे.

बाईकवर तीन ऑफर्स
कंपनी यावर 11,111 रुपयांच्या डाऊन पेमेंटसह 100 टक्के लोनची सुविधा आणि 1,555 रुपयांचा मंथली ईएमआयचा पर्याय देत आहे. ऑफरबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या डिलरशिपकडे संपर्क साधा.

100 टक्के लोनची सुविधा
कंपनीचे म्हणणे आहे की, कोरोना संकटात कॅशचा तुटवडा पहाता ग्राहकांना कमी ईएमआय आणि 100 टक्के लोन सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. कंपनीला आशा आहे की, यामुळे विक्री वाढेल. फिचर्सबाबत बोलायचे तर यामध्ये एलईडी बिट्स डीआरएल, क्लस्टरमध्ये एनालॉग स्पीडोमीटर, ओडोमीटर आणि इंधन गेज आहे.

टीव्हीएस स्पोर्टची किंमत
सध्या टीव्हीएस स्पोर्टच्या किक-स्टार्ट व्हर्जन किंमत 54,850 रुपयांपासून सुरू होते, तर याच्या सेल्फ स्टार्ट वेरियंटची एक्स-शोरूम किंमत 61,525 रुपये आहे. या बाईकला बीएस6 मानकांप्रमाणे या वर्षीच्या सुरूवातील लाँच करण्यात आले होते.

90 केएमपीएच टॉप स्पीड
बीएस6 टीव्हीएस स्पोर्टमध्ये 109.7 सीसीचा सिंगल-सिलेंडर एयर-कूल्ड इंधन-इंजेक्ट इंजन मिळते, जते 8.29पीएसची पावर आणि 8.7एनएमचा टॉर्क जेनरेट करते. हे इंजिन 4-स्पीड गियरबॉक्सपासून लेस करण्यात आले आहे. तर कंपनीचा दावा आहे की, तिचा टॉप स्पीड 90 केएमपीएच आहे.

You might also like