अवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे अलॉय व्हीलचे सेल्फ स्टार्ट व्हेरिएंट, इतका होईल मंथली EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – TVS Sport | कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी टीव्हीएस स्पोर्ट ही कंपनीची एक पॉप्युलर बाईक आहे. या बाईकची शोरूम प्राईज 58,130 रुपयांपासून 64,655 रुपये आहे. जर तुमचे इतके मोठे बजेट नसेल तर सोप्या डाऊन पेमेंट प्लानसह ती घरी घेऊन जाण्याची संपूर्ण माहिती जाणून घेवूयात. (TVS Sport)

टू व्हीलर सेक्टरची माहिती देणारी वेबसाइट BIKEDEKHO वर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही टीव्हीएस स्पोर्टची अलॉय व्हील आणि इलेक्ट्रीक स्टार्ट व्हेरिएंट खरेदी केली तर कंपनीसंबंधीत बँक या बाईकवर 68,076 रुपयांचे लोन देईल.

या लोनवर तुम्हाला 7,564 रुपयांचे किमान डाऊन पेमेंट करावे लागेल. ज्यानंतर दरमहिना 2,426 रुपयांचा ईएमआय चुकवावा लागेल. टीव्हीएस स्पोर्टवर मिळणार्‍या कर्जाचा कालावधी 36 महिने ठेवला आहे. कर्जाच्या रक्कमेवर बँक 9.7 टक्के वार्षिक दराने व्याज घेईल. (TVS Sport)

टीवीएस स्पोर्ट बाईकचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि माइलेज –

– बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध, किक स्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट.

सिंगल सिलेंडर 109.7 सीसी इंजिन, एयर कूल्ड तंत्रज्ञान.

इंजिन 8.29 पीएसची पावर आणि 8.7 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

4 स्पीड गियरबॉक्स.

फ्रंट आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक कॉम्बिनेशन.

मायलेजचा दावा 95 किलोमीटर.

 

Web Title :- TVS Sport | tvs sport electric start variant with down payment 7 thousand and emi plan read full details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप, बस चालकाविरुद्ध FIR

New Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’ येण्याची शक्यता; हाताशी येणार्‍या पगारात कपात?

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Jayant Patil on Pune Water Cut | पुण्यातील पाणी कपातीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा, म्हणाले… (VIDEO)