Aadhaar बाबत काहीपण प्रश्न असल्यास काळजी नाही ! Tweet करताच मिळणार उत्तर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे आहे. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणे अत्यंत गरजेचे झालं आहे. त्यामुळे त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. सरकारी अथवा खासगी कामांसाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा नाव, पत्ता, फोन नंबर किंवा फोटोबाबत चुका असतात. त्या बदलता येतात. सरकारी योजनांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे. परंतु अनेकदा आधार कार्ड संदर्भात काही प्रश्न आपल्याला पडतात. पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही.


आधार कार्ड संदर्भात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तसेच समस्यांचे निरसन करण्यासाठी UIDAI ट्विट मदत करणार आहे. लोकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. जर आधार कार्ड संदर्भात एखादी समस्या असेल तर UIDAI च्या ट्विटर हँडलवर प्रश्न विचारू शकता. ट्विटरवरून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येणार असून लोकांच्या समस्येचं निरसन करण्यात येणार आहे. या करता आधार कार्डधारकाला @UIDAI आणि @Aadhaar_Care या ट्विटर अकाउंटवर जाऊन ट्विट करावे लागेल. तसेच आधार केंद्राच्या कार्यालयांची वेगवेगळी ट्विटर हँडल आहेत, त्यावर देखील तक्रार करु शकता.

UIDAI च्या सर्व सेवा ऑनलाइन
आधारची ही सेवा कस्टमर केअर, फोन नंबर आणि मेल आयडी पेक्षा वेगळी आहे. 1947 हा UIDAIचा कस्टमर केअर क्रमांक आहे. तसेच [email protected] वर ईमेलवर देखील आधार संबंधित माहिती मिळू शकते. लोकांच्या आवश्यकतेनुसार UIDAI ने त्यांच्या अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहेत. आधार कार्डावरील नवापासून फोन नंबर, पत्ता आणि इतर अन्य माहिती बदलण्यापर्यंत अनेक काम ऑनलाइन करता येत आहेत.

पत्ता बदलणे झालं सोपं
आधार कार्डवरील पत्त्यामध्ये काही चूक किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेल्यास पत्ता बदलण्यासाठी अडचण येते. मात्र, आता आधार कार्डवरील पत्ता बदलणं अगदी सोपं झालं आहे. नियमानुसार आधार कार्डवरील पत्ता बदलणं आधीपेक्षा आता अधिक सोप झालं आहे. UIDAI कडून सेल्फ डिक्लेरेशन लेटरच्या माध्यमातून आता पत्ता बदला येऊ शकतो. यासाठी भाडे करार किंवा इतर कागदपत्रांची गरज नाही. ज्याला पत्ता बदलायचा आहे, त्याने आधार आधार केंद्रावर जाऊन सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म द्यावा लागेल आणि लगेच तुमचा पत्ता बदलला जाईल.

ऑनलाईन आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा
– सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत बेवसाईट http://uidai.gov.in वर जा त्यामध्ये My Adhaar वर क्लिक करा. यामध्ये Update your Aadhaar मध्ये जाऊन ड्रॉपडाऊनमधील तिसरा पर्याय Update your address online वर क्लिक करा.
– क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर Proceed to Update Address वर क्लिक करा. यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल.
– पेजवर आगोदर आधार नंबर, कॅपचा व्हेरिफिकेशन टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा. आधारसोबत रजिस्टर असलेल्या नंबरवर एक मेसेज येईल. त्यातील कोड घेऊन तो ओटीपीच्या जागी टाका आणि लॉगइन करा.
– पेजवर Update Address via Address Proof, Update Address Via Secred Code असे पर्याय दिलेले असतील. Address Proof पर्याय निवडल्यानंतर नवा पत्ता टाका. तसेच योग्य कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा. नातेवाईकाचा पत्ता आधार कार्डमध्ये टाकू इच्छित असाल तर त्याच्यासाठी दुसरा पर्याय देण्यात आला आहे.
– पर्यायावर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. ऑनलाईन व्हेरिफिकेशननंतर आधारकार्डवर पत्ता बदलला जाईल आणि नवीन आधारकार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवलं जाईल.