सोन्यामुळं प्रसिध्दीच्या झोतात सोनभद्र, 14000 हून जास्त ट्विट

सोनभद्र : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याचा साठा सापडल्याने सोनभद्र हे देशातच नव्हे, तर जगभरात चर्चेत आहे. शनिवारी सोनभद्र ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये होते. दुपारी 1 वाजेपर्यंत हॅशटॅग सोनभद्र आणि हॅशटॅग गोल्ड माईनद्वारे 14,000 पेक्षा जास्त ट्विट ट्विटर यूजर्सने केली होती.

सोनभद्रच्या कोन क्षेत्रातील पडरक्ष ग्राम पंचायतीच्याजवळ हरदी आणि सोन पहाडीमध्ये सोन्याचा 3,350 टनाचा साठा सापडला आहे. या साठ्याचा संबंध पूर्वांचलसह बिहार आणि झारखंडच्या विकासाशी जोडला जात आहे.

सोन्याच्या साठ्यावर जेव्हा कामकाज सुरू होईल. तेव्हा नक्षल प्रभावित सोनभद्र आणि मिर्जापूरच नव्हे, तर चंदौली आणि बिहार, झारखंडच्या युवकांना मोठ्याप्रमाणात रोजगारची संधी मिळेल.

सोशल मीडियावर मोदी आणि योगींना श्रेय
ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्मवर बहुतांश लोकांचे म्हणणे आहे की, हा पीएम मोदी आणि सीएम योगी सरकारच्या पारदर्शी कामकाजाचा हा परिणाम आहे.

तर काहींचे म्हणणे आहे की, हे साठे 20 वर्षांपूर्वीच शोधण्यात आले होते. सातत्याने याच्यावर काम करण्यासाठी भूवैज्ञानिकांना खुप वेळ लागला. खरे श्रेय भूवैज्ञानिकांचे आहे.