पॉर्न पाहण्याचे व्यसन लागलेल्या 12 वर्षीय मुलाने बहिणीसोबतच केलं भयंकर कृत्य

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पाहण्याची सवय लागलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाने आपल्या 6 वर्षांच्या दूरच्या बहिणीसोबत गैरकृत्य केल्याची घटना रायसिंहनगरमध्ये उघडकीस आली आहे. या मुलाला पॉर्न व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागल्याने त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणारा हा मुलगा अभ्यासासाठी वडीलांचा मोबाईल वापरतो. ऑनलाइन अभ्यासादरम्यान एकदा चुकून त्याच्याकडून मोबाईलवर आलेली पॉर्न व्हिडिओची लिंक ओपन झाली. तेंव्हापासून त्याला असे व्हिडिओ पाहण्याची सवय जडली. यातूनच त्याबद्दल उत्सुकता वाढल्याने त्याने आपल्या सहा वर्षांच्या लांबच्या बहिणीसोबतच गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. दरम्यान देशात सध्या लहान मुलांमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे निदर्शनास आले असून पालकांसाठी हा चिंतेचा विषय बनत आहे. नॅशनल सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रेन या संस्थेच्या सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 71 टक्के अल्पवयीन मुल मोबाइल किंवा लॅपटॉपवर पॉर्न व्हिडीओ बघत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास 33 टक्के मुलांनी पहिल्यांदा मोबाईलवर तर 38 टक्के मुलांनी लॅपटॉपवर पॉर्न व्हिडीओ बघितले असल्याचे समोर आले आहे.