सलग बाराव्या दिवशी पेट्रोल भडकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कर्नाटक निवडणुकीनंतर सलग आज १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल च्या दारात वाढ झाली आहे. या वाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या दरवाढीमुळे एस टी,बसेस च्या भांड्यांमध्ये देखील काही ठिकाणी दरवाढ करण्यात आली आहे. या दवाढीविरोधात केंद्र सरकारवर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहेत. आज पेट्रोल 36 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागले आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचे झालयास अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे. अमरावतीतील पेट्रोलचा आजचा दर 86.98 रुपये तर डिझेल 74.33 रुपये आहे.

केंद्र सरकार ढिम्म

पेट्रोल डिझेलचे दर आभाळाला भिडले तरी केंद्र सरकार मात्र ढिम्म आहे. यावर कोणताच निर्णय दिलया जात नाही .त्यामुळे सामान्य नागरिकात नाराजी आहे. काल एका खासगी कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फाडणवीस यांनी पेट्रोल दरवाढीबाबत प्रतिक्रिया दिली होती. ” आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे दार वाढले असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच इंधनांवर देखील जी एस टी लागू करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत त्यामुळे इंधनाची किंमत कमी होईल असे ते म्हणाले होते. ” पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. परंतु दरांवर नियंत्रण आणण्यात सरकारला आतापर्यंत यश आलेलं नाही.

वाढत्या इंधन दरवाढीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिलासा तर नाहीच पण पेट्रोल दरवाढीबाबत मोठा झटका बसला आहे.

संबंधित घडामोडी:

पेट्रोल आणखी ४ रुपयांनी महागणार

कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल दरात भाववाढ

खुशखबर…आता पेट्रोल डिझेल मिळणार लोनवर

मोदीजी आता माझेही चॅलेंज स्वीकारा : राहुल गांधी

इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा राज्यांना इशारा : पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान