घरफोड्या करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या चोरट्यांकडून १२ गुन्हे उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

बंद घराची टेहाळणी करुन, कडी-कोयंडा तोडून चोरी करणाऱ्या उत्तरप्रदेश येथील दोन चोरट्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सहा लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88564a78-aba5-11e8-8c98-2de18344f7ad’]

रविकिरण माताबदल यादव (२२, रा. ओमसाई अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 303, शिक्षक कॉलनी, पिंपळे निलख. मूळ रा. पतेरीया, पो. गढचपा, ता. माणिकपूर, जि. चित्रकूट उत्तरप्रदेश) आणि अनुपम नरेंद्र त्रिपाठी (२४, रा. साई अपार्टमेंट, बी विंग, मोरया पार्क, पिंपळे गुरव. मूळ रा. दरवेशपुरा, पो. भरवारी, ता. चायल, जि. कोसांबी उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

एक हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात 

अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी मधील चंद्रहिरा अपार्टमेंट या वसाहतीमध्ये शनिवारी (दि. 11 ऑगस्ट) घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले असता घराचा दरवाजा तोडून चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना वसाहतीच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रिकरण पोलिसांच्या हाती लागले.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक पोलीस फौजदार, भालेराव, पोलीस हवालदार माडीवाले, पोलीस नाईक रोहिदास बोऱ्हाडे, कैलास केंगले, भिसे, नितीन दांगडे, पोलीस शिपाई शशिकांत देवकांत, अरुण नरळे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, दीपक पिसे, शिमोन चांदेकर यांच्या पथकाने आरोपींची ओळख पटवून यादव आणि त्रिपाठी यांना ताब्यात घेतले.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d08c06a-aba5-11e8-bb34-554814aa71c3′]

त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता सांगवी येथील घरफोडीचा गुन्हा केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यावरून त्यांना अटक केली. तसेच दोघांनी मिळून सांगवी, सुस रोड, पाषाण, सुतारवाडी, चांदणी चौक, कोथरूड, कोंढवा, लोहगाव मधील तब्बल १८ ठिकाणी भर दिवसा घरफोडी केल्याचेही कबूल केले. या कारवाईमुळे सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ, कोथरुड, कोंढवा आणि भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक असे एकूण १२ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. विमानतळ, हिंजवडी, कोथरूड भागातील आरोपींनी दाखविलेल्या आणखी चार ठिकाणचे गुन्हे अद्याप दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ते गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकास पाच हजारांची लाच घेताना अटक 

चोरट्यांकडून २१५.०५ ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, दुचाकी असा एकूण सहा लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांच्याकडून सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ, कोथरुड, कोंढवा आणि भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक असे एकूण १२ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी