पीएमपीएलने निलंबित केलेले ‘ ते’ २९ कर्मचारी पुन्हा कामावर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन

निलंबित 29 कर्मचाऱ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सेवेत घेण्याचा निर्णय घेतला.याआधी पीएमपीने गैरहजेरी, बेशिस्त वर्तन आणि निष्काळजीपणाच्या कारणावरून या कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.

कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन तसेच पूर्वीचे चांगले वर्तन बघुन चाैकशी पुर्ण होण्यापुर्वीच 29 कर्मचाऱ्यांना पीएमपीने सेवेत घेण्याचा निर्णय आज घेतला.या कर्मचाऱ्यांना बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आले होते.यापुर्वी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करुन त्यांना सेवेत घेण्यात आले.निलंबन करुन वेतन देण्यापेक्षा ते जर रद्द केले तर कामकाज होईल असा दावा पीएमपी प्रशासनाने करत त्यांचे निलंबन रद्द केले.मागिल वर्षात अनेक कर्मचाऱ्यांना अपघात, बेशिस्त वर्तन, गैरहजेरी, उद्धट वर्तन, निष्काळजीपणा, कामचुकारपणा, तिकीट रकमेत तफावत अशा विविध कारणांनी निलंबित केले होते.

सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली असुन या समितीकडे निलंबनाची प्रकरणे त्यांची चाैकशी व निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याची कामेही देण्यात आली आहे. समितीच्या बैठकी मध्ये ३१ कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. नंतरच्या बैठकी दरम्यान २९ कर्मचाऱ्यांचे आरोप किरकोळ स्वरुपात असल्याच्या कारणावरुन त्यांचे निलंबन रद्द करण्याचे अंतिम ठरले.माञ त्यांची चाैकशी सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले. एकूण ६२ निलंबनाची प्रकरणे पीएमपी कडे होती.

समितीने २९ कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. या कर्मचाऱ्यांवर किरकोळ स्वरूपाचे आरोप आहेत. लवकरच त्यांचे निलंबन रद्दचे आदेश काढले जातील. अशी जनसंपर्क अधिकारी, पीएमपी सुभाष गायकवाड यांनी माहिती दिली.