पोलीस बंदोबस्तात ‘मुळा’तून पिण्यासाठी आवर्तन सुटले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले आहे. ३६ तास आवर्तन सुरू राहणार असून विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली आहे.

२६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातून ७०० क्युसेकने पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये पावसाने दांडी मारल्याने यंदा धरणात नव्याने पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे मुळा धरणाची पातळी दररोज खाली जात आहे. धरणात सध्या ४ हजार ९९९ दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी गरज पडल्यास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गुरूवारी रात्री दहा वाजता सदर आवर्तन सुरू झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर शेतीसाठी होऊ नये म्हणून महावितरणाला विद्युत पुरवठा करण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे मुळा आवडतं परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

जाणून घ्या का येतो ” तिरळेपणा “

ऑफिसाला जाणाऱ्यांनी पावसाळ्यात स्वतःची अशी काळजी घ्या

” उपवास ” हा आरोग्यासाठी फायदेशीर मात्र या लोकांसाठी घातक