वीस रुपयांचे नवे नाणे चलनात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०००, १००, ५००,५० च्या नव्या नोटा बाजारात आणल्यानंतर आता आरबीआयने २० रुपयाचे नाणे बाजारात आणले आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भातील अधिसूचना ६ मार्च रोजी जारी केली होती. या नाण्याप्रमाणेच एक रुपया, दोन रुपये आणि दहा रुपयांची नवी नाणी चलनात आणण्याचे सरकारचे नियोजन आहे.

असे आहे नवीन नाणे

२० रुपये मूल्याच्या या नाण्याचे डिझाईन साधारणतः १० रुपयांच्या नाण्यांप्रमाणेच आहे. नाण्याचा व्यास २७ मिलीमीटर (२. ७ सेमी) असून आतल्या बाजूने डिस्क आणि बाहेरच्या बाजूने रिंग आहे. तसेच जुन्या २ रुपयांच्या नाण्याप्रमाणे या नाण्याला १२ कडा आहेत . अंध व्यक्तींना देखील हे नाणे हाताळता यावे याप्रकारे याची डिझाईन करण्यात आली आहे. नाण्याच्या किनाऱ्यावर कोणतेच चिन्ह नाही. या नाण्याची बाहेरील कडा ६५% कॉपर,१५% झिंक आणि २०% निकेल धातूंची असून नाण्याची आतील कडा ७५ %कॉपर, २०% झिंकआणि ५%निकेल या धातूंनी बनलेली आहे.

१० वर्षांपूर्वी म्हणजे २००९ मध्ये आरबीआयने १० रुपयांचे नाणे बाजारात आणले होते. त्यानंतर आता २० रुपयांचे नाणे बाजारात आणले आहे. नोटा पाच वर्षापर्यंत चांगल्या राहतात असे मानले जाते. तर नाणी नेहमीच दिर्घकाळ चालतात. नोटा ठराविक काळानंतर खराब होणार म्हणून अधिक काळ टिकणारी नाणी चलनात आणली जात आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

पश्चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य घोषित करा : भाजप

करीना म्हणते बिकीनी घालावी की नाही हे सांगणार सैफ कोण ?

पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन अजित पवारांचे मोठे विधान

सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही शिवसैनिकांची मागणी

शरद पवारांची भविष्यवाणी नेहमीच खोटी ठरते