home page top 1

जत तालुक्यात अडीच कोटींचा गांज्या जप्त

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन

तालुक्यातील करजगी गावात एका व्यक्तीच्या शेतातील उसात लावलेली एक हजार तीनशे पन्नास किलो वजनाची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. बाजारभावानुसार त्याची किंमत अडीच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी महेश उर्फ पिंटू मल्लाप्पा पट्टणशेटी व त्याचा भाऊ श्रीशैल मल्लाप्पा पट्टणशेट्टी (रा. गरजगी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोघे आरोपी फरार झाले असून, त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या करजगी या गावातील एका व्यक्तीने आपल्या शेतात मोठ्याप्रमाणात गांज्याची लागवड केल्याची माहिती जतचे पोलीस उपअधीक्षक वाकुडे यांना आपल्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर वाकुडे यांनी उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे याच्या पोलीस पथकासह रविवारी सकाळी करजगीत छापा टाकला. यावेळी पट्टणशेट्टी यांच्या शेतात दीड एकर उसामध्ये गांजाची लागवड केल्याचे आढळले. ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून त्यांनी गांजाची झाडे लावली होती. एवढ्या मोठ्याप्रमाणात गांज्याची झाडे मिळून आल्यामुळे पोलीस देखील आवाक झाले. मिळालेल्या मुद्देमालाचा  रितसर पंचनामा केल्यानंतर गांजाच्या झाडांनी एक ट्रॅक्टर पूर्णपणे भरला. कडब्याप्रमाणे गांजाची झाडे रचून ट्रॅक्टर उमदीत आणला. त्याचे वजन काट्यावर वजन केले. गांजाचे वजन 1 हजार 350 किलो भरले आहे. त्याची बाजारभावानुसार अडीच कोटी रूपये किंमत होत असल्याचे सांगण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक वाकुडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरिक्षक सपांगे, हावालदार बामणे, कोळी, पाटील, पोलिस शिपाई आटपाडकर, सागर पाटील, यांनी केली.

Loading...
You might also like