Pune News : जुळ्या मुलींवर 4 वर्षापासून बाप करत होता अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सांस्कृतीक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील एका नराधम बापाने आपल्या जुळ्या मुलींवर मागील चार वर्षापासून बलात्कार केला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम बापा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून बापावर बाललैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना पुण्यातील कोंढवा खुर्द येथे घडली आहे. आरोपी आपल्या मुलींवर मागील चार वर्षापासून अत्याचार करत होता. पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात फिर्याद दिली. यामध्ये तीने पती मागील चार वर्षापासून मुलींवर अत्याचार करत असल्याचे म्हटले आहे. आरोपीचे फ्रॅब्रिकेशनचे दुकान असून त्याची पत्नी जून 2020 पासून आपल्या मुलींसह विभक्त रहात आहे.

तक्रारीमध्ये पत्नीने म्हटले आहे की, 2016 मध्ये दोन मुलींपैकी एका मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी तिला डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तिची सोनोग्राफी केली होती. मात्र, सोनोग्राफीचे रिपोर्ट पतीने जाळून टाकले. दरम्यान, एका रात्री मुलींसोबत आई बेडरुमध्ये तर आरोपी पती हॉलमध्ये झोपले होते. रात्री अडीचच्या सुमारास मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी हॉलमध्ये जाऊन पाहिले. त्यावेळी समोरच दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. मुलीने रडत वडिलांनी तिच्यावर जबरदस्ती केल्या सांगितले.