काय आहे ‘ट्विन-ट्विन’ ट्रान्सफ्यूजन सिंड्रोम, जाणून घ्या 2 ‘लक्षणे’ आणि 6 ‘उपचार’ व ‘धोके’

ट्विन-ट्विन ट्रान्सफ्यूजन सिंड्रोम (टीटीटीएस) एक दुर्मिळ आजार आहे. गर्भात आयडेंटिकल ट्विन म्हणजे एकसारखी दिसणारी जुळी मुले, ज्यांच्यात एकसारखे डीएनए असतात, त्यांना हा आजार होऊ शकतो. हा गर्भनलिकेशी संबंधित आजार आहे. जुळ्या मुलांचा विकास होत असताना, भ्रूणात रक्त वाहिन्या असतात, ज्या गर्भनलिकेतून रक्त प्रवाह करतात. या आजारात भ्रूणापर्यंत रक्तप्रवाह असामान प्रकारात होऊ लागतो. यामुळे दोन्हीपैकी एका भ्रूणाला जास्त प्रमाणात रक्त प्रवाहित होते, तर दुसर्‍याला कमी रक्ताचा पुरवठा होतो. ही स्थिती खुप धोकादायक असते. कारण ज्या भ्रूणास जास्त रक्त मिळते त्याच्या हृदयावर सतत दबाव येतो, यामध्ये हार्टफेल होऊशकते. तर दुसरे भ्रूण ज्यास कमी रक्त प्रवाह होतो त्यास अ‍ॅनिमिया, पोषणाची आणि ऑक्सीजनची कमतरता असे जीवघेणे आजार होऊ शकतात.

ही आहेत लक्षणे
1 यापैकी कमी रक्त मिळणारे शिशु दुसर्‍यापेक्षा छोटे असते. त्यास अ‍ॅनीमिया, पाण्याची कमतरता, त्वचा पिवळी अशा समस्या होतात.
2 जास्त रक्त मिळणारे शिशू तुलनेत मोठे असते, त्याची त्वचा लालसर आणि हायबीपीची समस्या असू शकते.

ही आहेत कारणे
* गर्भनलिकेतून एका जुळ्या मुलाला जास्त रक्त पुरवठा होतो. तर दुसर्‍याला कमी.

या आहेत टेस्ट
1 प्रोथ्रोम्बिन टाइम टेस्ट
2 पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम टेस्ट
3 कॉम्प्रिहेंसिव मेटाबॉलिक पैनल
4 कम्पलीट ब्लड काउंट
5 छातीचा एक्स-रे

असे केले जातात उपचार
1 वेळोवेळी एमनियोसेंटेसिस टेस्ट केली जाते.
2 गर्भावस्थेच्या दरम्यान, फीटल लेजर सर्जरीची मदत घेतली जाते.
3 जन्मानंतर मुलांमध्ये लक्षणांच्या आधारावर उपचार केले जातात.
4 कमी रक्त असणार्‍या शिशूला रक्त दिले जाते.
5 जास्त रक्त असणार्‍या शिशूच्या शरीरातील द्रव कमी करण्याची गरज असते.
6 हार्ट फेलसारखा धोका टाळण्यासाठी औषधे घ्यावी लागतात.