‘लॉकडाऊन’मध्ये पुन्हा एकदा ट्विंकल खन्नाचं नुकसान ! व्हिडीओ शेअर करत सांगितलं ‘दु:ख’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनं कोरोनाच्या युद्धात लढण्यासाठी 25 कोटींचं डोनेशन दिलं आहे. जेव्हापासून अक्षयनं डोनेशन दिलं आहे तेव्हापासून ट्विंकल खन्नाची अडचण काही कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊननंतर आता अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना कॉमन प्रॉल्बेलमसोबत झुंजताना दिसत आहे. तिनं सोशल व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा तिच्या अडचणी सांगितल्या आहेत.

ट्विंकल खन्नानं इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती चुष्मा आणि तुटलेली चप्पल दाखवत आपली अडचण सांगताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये ट्विंकल म्हणते, “मला माहिती आहे की, आपल्या समोर अनेक मोठ्या समस्या आहेत. परंतु यामुळं तर मी पागलच झाले आहे.”

व्हिडीओत ट्विंकल म्हणते, “माहिती नाही हा लॉकडाऊन आणखी किती दिवस राहणार आहे. आता मी नियंत्रण हरवण्याच्या स्थितीत आहे. कारण ही स्लिपर तुटली आहे जी या मॅचिंग शुची आहे(ट्विंकल आपला पाय दाखवत आहे जो मोडल्यानं त्याला प्लास्टर केलं आहे आणि त्यात एक शु घातला आहे).” हे सांगताना ट्विंकल जोरजारात हसताना दिसत आहे. बॅकग्राऊंडला अक्षय कुमारच्या हसण्याचाही आवाज येतो.

ट्विंकलच्या हा मजेदार व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे. अनेक चाहते यावर कमेंट करत आपली रिअॅक्शन देताना दिसत आहेत.