ट्रकवरील पोस्टर पाहून भडकली अभिनेत्री, म्हणाली ‘या सिनेमामुळं करिअर संपलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही 90 च्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जात होती. मेला या सिनेमामुळं एकाकी तिचं करिअर संपलं. आज 20 वर्षांनंतरदेखील या सिनेमाबद्दलची तिच्या मनातील नाराजी गेलेली नाही. तिनं नुकताच मेलाचा एक फोटो शेअर करत मनातील राग व्यक्त केला आहे.

मेला सिनेमातील खलनायक गुर्जरचं एक पोस्टर ट्विंकलला ट्रकवर दिसलं. तिनं याचा फोटो शेअर करत लिहिलं की, काही गोष्टी या टाईमलेस असतात. ज्यांना तुम्ही कधीही विसरू शकत नाही. मेला सिनेमामुळं माझ्या करिअरवरदेखील कधीही न पुसला जाणारा डाग लागला. तुम्हाला पाहायचं असेल तर हा सिनेमा पाहा असं म्हणत तिनं नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तिचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मेला सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 2000 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात ट्विंकल सोबत आमीर खान (Aamir Khan) आणि फैजल खान (Faisal Khan) प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला होता. त्यावेळी अनेक समीक्षकांनी सिनेमाची खिल्ली उडवली. यानंतर ट्विंकलला केवळ 4 सिनेमात काम मिळालं. ते चारही सिनेमे फ्लॉप झाले. यानंतर तिनं इंडस्ट्रीला कायमचा राम राम ठोकला.

ट्विंकलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बरसात, जान, बादशाह अशा काही सुपरहिट सिनेमात काम केलं आहे.