मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ट्विंकल खन्नाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खिलाडी अक्षय कुमार याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. यावेळी मोदींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. यावेळी अक्षयच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी ट्विंकल खन्नाला कोपरखळी मारली. दरम्यान मोदींच्या त्या कोपरखळीवर ट्विंकलने प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय कुमारने मोदींना सोशल मीडियाबाबत प्रश्न विचारला. तुम्ही सोशलवरील पोस्ट पाहता का असे विचारल्यानंतर मोदी म्हणाले की, “मी तुमचं (अक्षयचं) ट्विटरही पाहतो. मी ट्विंकल खन्ना यांचंही ट्विटर पाहतो. कधी कधी मला वाटतं की, त्या माझ्यावरील जो राग ट्विटरवर व्यक्त करतात, त्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात शांती रहात असेल.” हलक्या फुलक्या अंदाजात मोदी म्हणतात की, “त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघत असेल. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळत असेल. सुख मिळत असेल.” अशी कोपरखळी मोदींनी ट्विंकल खन्नाला मारली.

मोंदीनी मारलेल्या कोपरखळीवर आता ट्विंकलने प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देताना ट्विंकल खन्ना म्हणाली की, “पंतप्रधानांना फक्तक माझ्याविषयी माहिती नसून ते माझं लिखाणसुद्धा वाचतात, याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून बघते.” असे ट्विंकल म्हणाली आहे.