‘तुझ्या बेंबीने छान अभिनय केलाय’ असं म्हणणाऱ्याला ट्विंकल खन्नानं दिलं ‘असं’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनय क्षेत्रात फारशी न दिसणारी ट्विंकल खन्ना एक नावाजलेली लेखिका असली तरीही लोक तिला आज अभिनेत्री म्हणूनच ओळखतात. नुकतीच एका पोस्टमुळे ट्विंकल चर्चेत आली आहे. नुकतेच बादशाह सिनेमाने 20 वर्ष पूर्ण केले. या निमित्ताने शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये चाहत्याने 1999 साली रेडिफने दिलेला सिनेमाचा प्रिव्ह्यु पोस्ट केला. यात ट्विंकलच्या बेंबीबद्दल वक्तव्य करण्यात आलं होतं. दरम्यान ट्विंकलने यावर खोचक आणि मजेदार उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

Baadshah August 27, 1999. “Anu Malik has done a decent job with the music — the title song is good, while others like Yahan wahan kadam kadam pe lakhon haseenaen hai and Main to hoon pagal are quite in the hummable category. Shahrukh has performed well, so have Twinkle and her navel, which was in full view right through the film. Amrish Puri is very good as the villain with the sense of humour. Rakhee, unfortunately is wasted — all she does is address press conferences and seminars.” – Rediff Movie Review, 1999. Caption courtesy Syed Firdaus Ashraf of Rediff Movies. @iamsrk @twinklerkhanna @tips @abhijeetbhattacharya @therealalkayagnik @anumalikmusic #baadshah #20retroyears #20yearsofbaadshah #kingofbollywood #shahrukhkhan #shahrokhkhan #shahrukh #shahrukh_khan #shahrukhan #shahrukhkhanfans #twinklekhanna #twinklekhannakumar #abbasmustan #bhawarjain #girishjain #shyamgoel #anumalik #surindersodhi #thomasxavier #humtodeewanehueyaar #abhijeetbhattacharya #abhijeet #alkayagnik #90sbollywood #90sbollywoodhits

A post shared by @ retrobollywood on

रेट्रो बॉलिवूड या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शाहरुख खान आणि ट्विंकल खन्ना यांच्या बादशाह सिनेमाबद्दल पोस्ट टाकण्यात आली आहे. 27 ऑगस्ट 1999 कोजी रेडिफने लिहिलेल्या या रिव्ह्युमध्ये असा उल्लेख होता की, सिनेमात शाहरुख, ट्विंकल आणि ट्विंकलच्या बेंबीने चांगले काम केले आहे. लेखकाने असा टोला लगावला होता की, सिनेमात ट्विंकलची बेंबी प्रामुख्याने दिसत होती.

या पोस्टची दखल घेत ट्विंकलने या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला आणि याला खोचक आणि मजेदार पद्धतीने उत्तरही दिले. आपल्या पोस्टमध्ये ट्विंकल म्हणाली की, “माझ्या सिनेमांना चांगला रिव्ह्यु मिळत नाही असं मी कधी म्हणाले होते का ? मी माझ्या अवयवांच्या मदतीने भावना उफाळून येणारा अभिनय केला. बादशाह सिनेमाला 20 वर्षे झाली तरी या सिनेमात काम करणाऱ्या दोन्ही कलाकरांकडे त्यांच्याकडची विशेष गोष्ट आजही आहे. शाहरुखकडे त्याची खळी आणि माझ्याकडे माझी बेंबी. हा रिव्ह्यु पाठवून माझ्या दिवसाची तजेलदार सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद.”

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like