Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाने लेकी बाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाली “तिला कालांतराने थेरपीची गरज भासू शकते….”

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली मात्र गेल्या अनेक वर्षापासून ती बॉलिवूड (Bollywood) पासून लांब आहे. तरीदेखील ट्विंकल खन्ना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. ट्विंकल खन्ना तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ट्विंकलने लग्नानंतर बॉलीवूडला कायमचाच रामराम ठोकला आहे. ती जरी बॉलीवूडमध्ये काम करत नसली तरी देखील ट्विंकल खन्ना अनेक कार्यक्रमात सहभागी होताना दिसते. नुकताच एका कार्यक्रमादरम्यान ट्विंकल खन्नाने कोरोना काळातील तिच्या मुलीचा एक महत्त्वाचा किस्सा शेअर केला आहे.

ट्विंकल खन्नाने अलीकडेच ‘खाना खजाना’ फेम संजीव कपूरच्या चॅट शोमध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी ती अनेक विषयावर चर्चा करताना दिसली. 2020 साली आलेल्या कोरोना महामारीमुळे तिच्या आयुष्यात कशाप्रकारे बदल घडले यावर तिने भाष्य केले. या काळात तिने स्वतःला स्वयंपाक करता येत नसल्यामुळे ती आपल्या मुलीला रोज पीनट बटर सँडविच खायला देत होती. यावेळी अक्षयने देखील स्वयंपाक बनवण्यास नकार दिल्यामुळे तिच्यासमोर कोणत्याच पर्याय उरला नव्हता.

यावेळी ट्विंकल खन्ना म्हणाली की, “साथीच्या काळात मला स्वयंपाक करता येत नसल्यामुळे मी माझ्या मुलीला रोज पीनट बटर सँडविच देत होते आणि मला आता असे वाटते की तिला कालांतराने थेरपीची गरज भासू शकते.
इतर मुलांचे पालक पास्ता, केळी ब्रेड सँडविच असे स्वादिष्ट जेवण आपल्या मुलांना बनवून खाऊ घालत होते.
मात्र मी फक्त तिला पीनट बटर आणि टोस्ट खाऊ घालत होते”.
ट्विंकल तिच्या वैवाहिक जीवनानंतर खूपच चर्चेत आली. ‘बरसात’ हा ट्विंकलचा पहिला हिट चित्रपट ठरला.
त्यानंतर ती अनेक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून आली मात्र तिने प्रेक्षकांवर
फारशी जादू केली नाही. सध्या ट्विंकल सोशल मीडियावर फारच सक्रिय असल्याचे दिसते.

Web Title :  Twinkle Khanna | twinkle khanna is worried daughternitara might need therapy in the future because she was given home cooked food during lockdown

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohit Kamboj | ‘उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन अनिल जयसिंघानी गजाआड आता…’, भाजप नेते मोहित कंबोज यांचे खळबळजनक ट्विट

Pune Crime News | जेलमधून जामीनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने धावत्या रेल्वेतून पत्नी, मुलीला ढकलले, 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)