दुर्देवी ! एकत्र आले अन् सोबत घेतला जगाचा निरोप, बर्थडेच्या काही दिवसानंतर कोरोनानं संपवलं जुळ्या भावांचं आयुष्य

मेरठ : वृत्त संस्था – कोरोना महामारीच्या तांडवापुढे सामान्य माणूस हतबल झाला आहे. कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होत आहेत, आई-वडील आपल्या मुलांना गमावत आहेत, तर मुलेसुद्धा अनाथ होत आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये या महामारीने एक रौद्र रूप दाखवले आहे. येथे दोन जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जे भाऊसोबत जन्माला आले होते, त्या दोघांना या महामारीने सोबतच गिळंकृत सुद्धा केले.

मेरठमध्ये राहणारे ग्रेगरी रेमंड राफेल यांची दोन मुले इंजिनियर होती, त्यांची नावे होती, जोफ्रेड वर्गीस ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी. यांनी 23 एप्रिलला दोघांनी आपला 24वा वाढदिवस साजरा केला होता, परंतु कुणालाच माहित नव्हते की त्यांच्या जीवनातील हा शेवटचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशीच दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि आता 13, 14 मे रोजी दोन्ही भावांनी अखेरचा श्वास घेतला.

जुळ्या भावांचे वडील ग्रेगरी रेमंड राफेल म्हणाले की, त्यांचे कुटुंब या घटनेने उध्वस्त झाले आहे. आता आम्ही केवळ तीन लोकच कुटुंबात उरलो आहोत. ग्रेगरी यांनी सांगितले, दोन्ही मुले 10 मे रोजी कोरोना निगेटिव्ह झाली होती. परंतु, 10 मे नंतर अचानक पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली आणि 13, 14 मे रोजी दोघांचे निधन झाले.

ग्रेगरी रेमंड यांनी सांगितले, ते आणि त्यांची पत्नी सेंट थॉमस स्कूलमध्ये शिकवतात. त्यांच्या दोन्ही मुलांनी बी-टेकपर्यंत शिक्षण घेतले होते, ज्यानंतर चांगल्या कंपनीत दोघे नोकरी करत होते. दोन्ही मुलांच्या जन्मात केवळ तीन मिनिटांचे अंतर होते, ज्यामध्ये राल्फ्रेड छोटा भाऊ होता. आता कोरोना महामारीने दोन्ही भावांना कोरोना महामारीने कुटुंबापासून हिरावले आहे.