नवी दिल्ली : वृत्त संस्था – मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर मोठ-मोठ्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट अचानक बंद झाले आणि बिटक्वाइनची मागणी करणारा ट्विट करू लागला. जेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आले तेव्हा समजले की, हे आतापर्यंतचे सर्वात मोठे ट्विटर हॅकिंग झाले आहे. हॅकर्सने जगातील दिग्गज नेते, सेलिब्रेटी, प्रसिद्ध उद्योजक आणि कंपन्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केले आहे. आता या हॅकिंगवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ट्विटरने वक्तव्य जारी करून लोकांची ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू केली आहेत.
बुधवारी हॅकर्सने ज्यांची ट्विटर अकाऊंट हॅक केली, त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेचे माजी उप राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, वॉरेन बफेट, अॅप्पल, उबरसह अनेकांची अकाऊंट हॅक केली आहेत.
हॅकर त्यांच्या अकाऊंटवरून ट्विट करत आहेत आणि बिटक्वाइनची मागणी करत आहेत. हॅकर्सने मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले, प्रत्येकजण माझ्याकडून पर देण्यास सांगत आहे आणि आता वेळ आली आहे. मी पुढील 30 मिनिटापर्यंत बीटीसी अॅड्रेसवर पाठवण्यात आलेले सर्व पेमेंट दुप्पट करत आहे. तुम्ही एक हजार डॉलर पाठवा आणि मी तुम्हाला दोन हजार डॉलर परत पाठवेन.
पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांच्या आतच हे ट्विट डिलिटसुद्धा झाले. मात्र, अजून हे समजलेले नाही की, अखेर कुणी या दिग्गज लोकांच्या ट्विटर अकाऊंटला निशाणा बनवले होते. बहुतेक प्रत्येक मोठ्या दिग्गजाच्या अकाऊंटवरून ट्विट करून बिटक्वाईनची मागणी केली जात होती.
तर, या घटनेनंतर ट्विटरने म्हटले की, आम्हाला ट्विटर अकाऊंट हायजॅक होण्याची माहिती मिळाली आहे. सध्या आम्ही तपास करत आहोत. सोबतच हे दुरूस्त करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आम्ही लवकरच सर्वांना अपडेट करू. याशिवाय ट्विटरचे सीईओ जॅक यांनी सुद्धा ट्विट करून म्हटले की, आमच्यासाठी आजचा दिवस खुप अडचणींचा होता, जी हॅकिेंग झाली होती, त्यामध्ये आता सुधारणा केली आहे आणि पुढे याची चौकशी सुरू राहील.
हॅकिंगच्या घटनेनंतर ताबडतोब ट्विटरने ट्विट आणि रिट्विट फंक्शन डिसेबल केले. ट्विटरने म्हटले की, ज्यामुळे युजर्स आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करू शकत नसतील आणि पासवर्ड रिसेट करू शकत नसतील. ट्विटरकडून जवळपास सर्वच ब्लू टिक म्हणजेच व्हेरिफाईड अकाऊंट बंद करण्यात आली होती, मात्र काही तासानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली आणि आता हे लोक पुन्हा ट्विट करू शकत आहेत.
हॅकिंगवर ट्विटरचे को-फाउंडर जॅक डॉर्सी यांनी ट्विट करत म्हटले, ट्विटरवर आमच्यासाठी कठिण दिवस. हे झाल्यानंतर आम्हाला भयानक वाटत आहे. आम्ही ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व काही शेयर करू, आमच्याकडे प्रत्यक्षात काय झाले याची माहिती मिळेल. ट्विटरची टीम मेहनत करत आहे.
सायबर सिक्युरिटी हेड अल्पेरोविच यांचे म्हणणे आहे की, सामान्य लोकांचे काही मर्यादेपर्यंत नुकसान झाले आहे. या हॅकदरम्यान हॅकर्सने सुमारे 300 लोकांकडून 1 लाख 10 हजार डॉलर बिटक्वाईन काढू शकले आहेत. परंतु, मोठ्या संख्येने हे हॅकिंगवाले ट्विट लोकांपर्यंत पोहचण्यापूर्वी ते हटवण्यात आले.
आता ट्विटरकडून याची पूर्ण चौकशी केली जात आहे, कारण जगातील मोठे नेते आणि उद्योगपतींचे अकाऊंट हॅक झाले आहे. एवढेच नव्हे, तर स्वत: ट्विटरच्या अकाऊंटवरून चुकीचे ट्विट केले गेले.