‘ट्विटर’ने जाहिरातीसाठी वापरलेल्या ‘मोबाइल’ नंबर प्रकरणी मागितले ‘माफी’, म्हणाले, पुन्हा अशी ‘चूक’ होणार नाही

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या यूजर्सची माफी मागितली आहे. ट्विटरने सांगितले की, चुकून काही यूजर्सचे मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचा वापर जाहिरातीसाठी केला आहे. परंतू ट्विटरला यूजर्सला आपल्या ग्राहकांना अंधारात ठेवायचे नव्हते. त्यामुळे कंपनी ही माहिती ट्विटद्वारे कळवली.


ट्विटरने ट्विटमध्ये म्हणले की आम्हाला आता लक्षात आले की अकाउंट सिक्युरिटीसाठी यूजर्सकडून देण्यात आलेल्या काही ईमेल आणि फोन नंबरचा जाहिरात म्हणून वापर झाला आहे. आता पासून असे होणार नाही आणि आम्ही यापासून यूजर्सला अंधारात ठेवू इच्छित नव्हतो.

या ट्विटसह ट्विटरने एका पत्र देखील अटॅच केले आहे, ज्या कंपनीने स्पष्ट माफी मागितली आणि सांगितले की पुढे अशी चूक होणार नाही. कंपनीने असे ही सांगण्यात आले की थर्ड पार्टी यूजरला असा कोणताही डाटा देण्यात आला नाही. कंपनीने सांगितले की हे प्रकरण सप्टेंबरमध्ये झाले होते आता त्याचे निरासरण करण्यात आले नाही परंतू कंपनीला वाटत होते की कंपनीला याची माहिती असावी.

Visit : Policenama.com