Twitter ची मोठी घोषणा ! आता दर महिन्याला कमावता येणार पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज काल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यामध्ये जर तुम्ही ट्विटर वापरात असाल तर तुमच्यासाठी आंनंदाची बातमी आहे. तुमचे जर ट्विटरवर जास्त फॉलोवर्स असतील तर तुम्ही आता इन्स्टाग्राम, यूट्यूबप्रमाणे तुम्हाला पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे.

कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ट्विटरकडून २ नव्या फिचरची माहिती देण्यात आली आहे. याच नव्या फिचरद्वारे युजर्सला पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता युजर्सला आपल्या फॉलोवर्सला अतिरिक्त कंटेंट दाखवण्याची आणि समूहावर आधारित विशेष कंटेंट तयार करण्याची आणि समूहात समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे.

दर महिन्याला किती होईल कमाई ?
इंटरनॅशनल वेबसाईट The Verge ने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये आपल्याला एक सुपर फॉलो पेमेंट फीचर मिळणार आहे. ज्यामध्ये युजर्स आपल्या फॉलोवर्सला अधिक कंटेंटपर्यंत पोहचवण्यासाठी पैसे घेऊ शकतो. यामध्ये बोनस ट्वीट, कम्युनिटी ग्रुपपर्यंत पोहच, न्यूजलेटरची सदस्यता असे सामील करण्यात आले आहे. ट्वीटरकडून याचे स्क्रिनशॉट शेअर करण्यात आले आहे. यामध्ये आपण दर महिन्याला ४.९९ डॉलर कसे मिळवू शकता हे दाखवण्यात आले आहे. आपल्या फॅन्सद्वारे ट्विटर आपल्याला कमाई करण्याची संधी देत आहे. परंतु या सुविधा कधी पर्यंत सुरु केल्या जातील याची कोणतीही अधिकृत माहिती अजून समजलेली नाही.

फेसबुक, यूट्यूबकडूनही पेमेंट सर्विस लाँच
युजर्ससाठी सध्या डायरेक्ट पेमेंट टूल अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. फेसबुकपासून यूट्यूबपर्यंत सगळ्या सोशल मिडीयाकडून पेमेंट सर्व्हिस लाँच करण्यात आली आहे. यामुळे ट्वीटरने सुद्धा ही सर्व्हिस लाँच केली आहे. ट्विटरकडून आपल्या फीचरचे नाव कम्युनिटी असे ठेवण्यात आले आहे. हे फीचर फेसबुक प्रमाणेच असणार आहे. यामध्ये युजर्स त्याला हवा तसा ग्रुप बनवू शकतो. ट्वीटर आपल्या युजर्सला त्यांच्या पसंतीनुसार, अनेक विषयांवरील ट्वीट दाखवेल.