×
Homeआर्थिकTwitter चा वापर 'फ्री'मध्ये करता येणार नाही; 'या' सर्व्हिससाठी लागतील 200 रुपये...

Twitter चा वापर ‘फ्री’मध्ये करता येणार नाही; ‘या’ सर्व्हिससाठी लागतील 200 रुपये महिना, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर सेवा विनामूल्य वापली जाते. दरम्यान, ट्विटर लवकरच ट्विटर ब्लू ही नवीन सेवा सुरु करणार आहे. ही सशुल्क सदस्यता आधारित सेवा असेल, ज्यासाठी वापरकर्त्यांना दरमहा 2.99 डॉलर द्यावे लागतील. याआधी ट्विटरने सशुल्क सदस्यता मॉडेल सादर करण्याविषयी स्पष्ट केले होते. शनिवारी अॅप संशोधक जेन मंचन बोंग यांनी ट्विटर ब्लू नावाचे ट्विटर पेड सबस्क्रिप्शन मॉडेल सादर केले. यात बुकमार्क संग्रह वैशिष्ट्य देखील जाहीर केले. या सेवेसाठी भारतात दरमहा 200 रुपये मोजावे लागणार आहे. ट्विटर ब्लू प्रथम अमेरिकेतच लाँच केले जाईल, त्यानंतर ते इतर देशात सुरु करण्याची तयारी ट्विटर करत आहे.

यामध्ये काय आहे विशेष

एका वृत्तानुसार, ट्विटर ब्लू अनेक वैशिष्ट्यांचा संग्रह आहे. ही वैशिष्ट्ये ट्विटरच्या मोफत आवृत्तीमध्ये मिळणार नाहीत. त्या ट्विटला एडिट करण्याचा पर्याय देण्यात येईल. ज्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. म्हणजे युजर्सला ट्विट पब्लिश झाल्यानंतर 5 ते 30 सेकंद डिलीट करण्याचा पर्याय असेल. याशिवाय ट्विट सेव्ह करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. यामुळे युजर्सना ते पुन्हा शोधता येईल. थोडक्यात युजर्सला ट्विट Collect करण्याचा पर्याय असेल.

मिळणार या सेवांचा लाभ

ट्विटर इतर अनेक वैशिष्ट्यांवर काम करत आहे. त्याअंतर्गत फोटो काढणे सोपे जाणार आहे. तसेच फोटोला डिस्प्ले व्ह्यू पर्यायही दिला जाऊ शकतो. याशिवाय कन्टेन्ट क्रिएटर्स, पत्रकार, तज्ज्ञ, नॉन प्रॉफिट आर्गेनाइजेशन यांना देणगी देण्याची सुविधा असणार आहे.

Must Read
Related News