डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया आणि कॅनडाचे जस्टिन ट्रूडोंच्या ‘या’ फोटोमुळं जगभर नको ‘ती’ चर्चा ! सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी ७ शिखर सम्मेलनाचे काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना भेटताना दिसून येत आहे. यामुळे फोटोची चर्चा जगभर होत असून दोघांच्या भेटण्याच्या पद्धतीवर विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

 

रविवारी संध्याकाळी या शिखर संमेलनात हे फोटो काढण्यात आले असून त्यावेळी ट्रम्प आपल्या पत्नीबरोबर कौटुंबिक फोटो काढून निघाले होते. या फोटोत मेलानिया ट्रम्प या जस्टिन ट्रूडो यांना भेटताना आपल्या पारंपरिक किससाठी खाली वाकलेल्या दिसून येत आहेत. त्याचवेळी ट्रम्प हे खाली पाहून चालत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी त्याला अपलोड करत फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मिम्स देखील व्हायरल होत असून विविध प्रकारच्या कमेंट्समधील त्यावर पडत आहेत. एका युझरने या फोटोवर ट्विट करत म्हटले कि, मेलानिया सर्व प्रकारची जोखीम स्वीकारायला तयार आहेत. त्याचबरोबर अनेक युझर्सनी हा फोटो ट्विट करत मजेशीर कमेंट केल्या आहेत.

https://twitter.com/pca_investor/status/1165953400850321408

दरम्यान, या संमेलनाविषयी अशा प्रकारचे मजेदार मिम्स आणि फोटो व्हायरल होण्याची हि पहिलीच वेळ नसून याआधी देखील जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो व्हायरल झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –