धक्‍कादायक ! Twitter चे CEO Jack Dorsey यांचे अकाउंट झालं ‘हॅक’

दिल्ली : वृत्तसंस्था – ट्विटरचे मुख्य कार्यकारी आधिकारी जॅक डॉर्सी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. काल रात्री त्यांचे अकाउंट हॅक करण्यात आले असून त्यावरून मोठ्या प्रमाणात आपत्तीजनक ट्विट करण्यात आले आहेत. हॅकरने त्यांच्या अकाऊंटवरून जॅक यांच्यावर वंशभेदाचा आरोप केला. त्याचबरोबर ट्विटरच्या मुख्यालयात बॉम्ब असल्याची अफवा देखील पसरवली. आपत्तीजनक ट्विट लक्षात आल्यानंतर त्यांना डिलीट करण्यात आले.

काही ट्विटमध्ये #चकलिंगस्क्वाड लिहिले होते. हा एक हॅकर्सचा समूह आहे. त्याचबरोबर त्यांनी जर्मनीच्या नाझीवादाच्या समर्थनार्थ देखील ट्विट केले आहे. ट्विटरच्या प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली असून जॅक डॉर्सी यांचे देखील अकाउंट हॅक झाल्याचे त्याने मान्य केले. ट्विटरवर त्यांचे 42 लाख फॉलोअर्स असून अर्ध्या तासांनंतर ट्विटरच्या टीमने त्यांचे अकाउंट रिकव्हर केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्विटर युझर्सनी त्यावर प्रश्न उपस्थित करत टू-स्टेप व्हेरिफिकेशन केलेलं नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर प्रमुखाचे अकाउंट सुरक्षित नसेल तर आमच्या अकाउंटचे काय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, Chuckling Squad नावाच्या व्यक्तीने जगभरातील अनेक मोठ्या व्यक्तींचे अकाउंट हॅक केल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर नुकतेच त्यांनी ब्‍यूटी ब्लाॅगर जेम्‍स चार्ल्‍स यांचे देखील अकाउंट हॅक केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like