ट्विटरचे CEO ‘जॅक’ यांनी उघडली ‘तिजोरी’, ‘कोरोना’च्या लढाईसाठी केले 76 अरब रूपये ‘दान’

पोलीसनामा ऑनलाईन : ट्विटरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 76.13 अब्ज रुपये) चा निधी जाहीर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे पैसे त्यांच्या नेट वर्थच्या सुमारे 28% आहेत. जॅक डोर्सी यांनी म्हटले की, स्क्वॉअरमध्ये गुंतवणूक केलेले 1 अब्ज डॉलर्स इक्विटी चॅरिटेबल फंडामध्ये दान करीत आहोत. तसेच हा निधी स्टार्ट स्मॉल एलएलसीला ग्लोबल कोविड -19 रिलीफ म्हणून दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे स्क्वायर ही एक कंपनी आहे ज्यांचे सहकारी संस्थापक जॅक डोर्सी आहे. त्यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. ही देणगी त्याच्या एकूण संपत्तीच्या 28% इतकी आहे असेही त्यांनी म्हटले आहे. माहितीनुसार, जगातील कोरोनाशी लढण्यासाठी एखाद्या व्यक्तीने दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे. जेफ बेझोसबद्दल बोलायचे झाल्यास, तर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याने अमेरिकन फूड बँकेला 100 मिलियन डॉलर दान केले आहे.

माहितीनुसार, ट्विटर आणि स्क्वेअरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांचा नेट वर्थ 3.9 अब्ज डॉलर्स आहे. दरम्यान, कोरोनाविरूद्ध युद्धासाठी हे पैसे कोठे पाठविले जातील हे अद्याप जॅक डोर्सी यांनी स्पष्ट केले नाही. जॅक डोर्सी यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, या साथीच्या संकटानंतर आपले लक्ष मुलींचे आरोग्य आणि शिक्षणाकडे वळेल. हे पारदर्शक मार्गाने कार्य करेल असेही त्यांनी म्हटले आहे. या ट्विटसह त्यांनी गुगल डॉक्युमेंटही जोडले आहे. ट्वीटला जोडलेल्या या गुगल डॉकच्या माध्यमातून त्यांची इच्छा आहे कि, त्यांनी दिलेले फंड डोनेशनला पब्लिकली ट्रक केले जावे. सर्वसाधारणपणे लिमिटेड लायब्लिटी कंपनी म्हणजेच एलएलसी, ज्यामार्फत डोर्सी दान करत आहेत. यात पारदर्शकते संदर्भात समस्या येतात. म्हणून त्यांनी हे तपशील शेअर केले.