Twitter नं बदलली Retweet करण्याची पद्धत, जाणून घ्या काय झाला बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आपल्या यूजरसाठी नवनवीन फिचर आणत असते. आता ट्विटरने कोणत्याही मॅसेज किंवा ट्विटला रिट्विट करण्याची पद्धत बदलली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने खोटा मजकूर रोखण्यासाठी एक नवीन फिचर लाँच केले आहे. या सोशल नेटवर्किंग कंपनीने ट्विट करून सांगितले आहे की, काही लोक अशी चुकीची ट्विट वाचल्यानंतर ते रिट्विट न करता सोडून देतात. ट्विटरला सुद्धा हेच हवे आहे, कारण अशाप्रकारची ट्विट नेहमी रिट्विट करण्याच्या लायक नसतात. यापूर्वी ट्रायल बेसिसवर जूनमध्ये ट्विटरने अँड्राइडवर एक इनफॉर्मल डिस्कशन नावाचे फिचर सुरू केले होते.

अशाप्रकारे काम करेल नवे फिचर
जर तुम्ही तुमच्या ट्विटर हँडलवरून ज्यावेळी एखाद्या मॅसेजला किंवा टेक्सला रिट्विट करण्याच्या ऑपशनला टॅप कराल, एक नवीन पॉपअप समोर येईल. यामध्ये लिहिले आहे ’Headlines don’t tell the full story.’ ट्विटरला वाटते की, तुम्ही कोणत्याही कमेंटवर किंवा टेक्टला रिट्विट करण्यापूर्वी अगोदर हेडिंग द्या किंवा काहीतरी लिहा. ट्विटरचे म्हणणे आहे की, यातून यूजर्सलाही नवीन अनुभव मिळेल.

काही न लिहिता कसे कराल रिट्विट
जेव्हा तुम्हाला एखादे ट्विट रिट्विट करायचे असेल, तेव्हा हे पॉपअप समोर येणारच. परंतु, असे नाही की तुम्हाला रिट्विट करण्यापूर्वी काहीतरी लिहायलाच पाहिजे. तुम्ही काहीही न लिहिता सुद्धा रिट्विट करू शकता. यासाठी पॉपअप उघडताच रिट्विट ऑपशनला दोन वेळा टॅप करा. टॅप केल्यानंतर तुमची पोस्ट रिट्विट होईल.

चुकीच्या बातम्या पसरण्यावर प्रतिबंध
कोणत्याही गोष्टीला विनाकारण पसरवण्यासाठी सुद्धा ट्विटरचा मोठा वापर होत आहे. मागील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतसुद्धा ट्विटर आणि फेसबुकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठा वापर झाला होता. याच कारणामुळे यावेळी ट्विटरने रिट्विट फिचरमध्ये बदल केला आहे.