सुपरस्टार रजनीकांतनं PM मोदींच्या समर्थनात पोस्ट केला व्हिडीओ संदेश, ‘या’ कारणामुळं ट्विटरनं केला ‘डिलीट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जनता कर्फ्यू’ला पाठिंबा देत तामिळ चित्रपटांचे सुपरस्टार रजनीकांत यांनी लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी आपला व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे, परंतु काही वेळानंतर ट्विटरने या व्हिडिओला काढून टाकले आहे. ट्विटरने म्हटले आहे की, रजनीकांत हे लोकांमध्ये कोरोना व्हायरसबद्दल चुकीची माहिती पसरवित आहेत. वास्तविक या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी, ते म्हणाले की, कोरोना व्हायरस केवळ 14 तासांपर्यंत टिकू शकेल. ही माहिती चुकीची असल्यामुळे ट्विटरने संपूर्ण व्हिडिओ हटविला आहे.

ट्विटरच्या या पाऊलानंतर #ShameOnTwitterIndia नावाचा हॅश टॅग भारतात ट्रेंड होऊ लागला आहे. लोक ट्विटरवरून व्हिडिओ काढण्याचे कारण विचारू लागले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोना व्हायरस केवळ 12 ते 14 तासच नव्हे तर संपूर्ण दिवस राहू शकतो. इतकेच नाही तर हा व्हायरस अनेक आठवडे राहतो.

रजनीकांत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ‘भारत यावेळी कोरोना पसरवण्याच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे. कोरोनाला तिसर्‍या टप्प्यात पोहोचण्यापासून रोखण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. हा व्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्यासाठी 12 ते 14 तासांचा वेळ घेतो. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी सार्वजनिक कर्फ्यू लावला होता.’

इटलीमध्ये जेव्हा हा संसर्ग दुसऱ्या टप्प्यात होता तेव्हा कोणीही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, असेही ते म्हणाले. यामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. आपल्याला भारतात असे होऊ द्यायचे नाही. आपण सर्व लोकांनी सार्वजनिक कर्फ्यूचे पालन करणे गरजेचे आहे.