Twitter ने भारतात कोविड -19 मदतीसाठी डोनेट केले 110 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. अशा संकटाच्या काळात ट्विटरने भारताच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने भारताला कोविड -19 संकटातून बाहेर येण्यासाठी 15 मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे 110 कोटी रुपये) दान दिले आहेत.

ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी सोमवारी ट्विट केले की, ही रक्कम तीन नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन केयर, एड इंडिया आणि सीव्हर इंटरनॅशनल यूएसएला दान करण्यात आली आहे. केयरला 10 मिलियन डॉलर, एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनलसाठी 2.5 मिलियन डॉलर देण्यात आले आहेत.

ट्विटरने आपल्या वक्तव्यात सांगितले की, सेवा इंटरनॅशनल एक हिंदू श्रद्धा आधारित, मानवता, नॉन प्रॉफिट सर्व्हिस ऑर्गनायजेशन आहे. ती लाईफ सेव्हिंग डिव्हाइस जसे की ऑक्सीजन कन्सेंट्रेटर, व्हेंटिलेटर, बायपॅप आणि सीपॅप मशीन खरेदी करेल.

हे डिव्हाईस सरकारी हॉस्पिटल आणि कोविड -19 केयर सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये वाटले जातील. घोषणेवर प्रतिक्रिया देताना, सर्व्हिस अँड फायनान्स आणि फंड अँड मार्केटिंगसाठी सेवा इंटरनॅशनलचे व्हाईस चान्सलर संदीप खडकेकर यांनी जॅक डोरसी यांचे या डोनेशनसाठी आभार मानले.