Twitter युजर्सना पैसे कमावण्याची ‘सुवर्ण’संधी; जाणून घ्या .

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतासह जगभरात Twitter चा मोठा युजरवर्ग आहे. अनेक लोक एकमेकांना फॉलो करत असतात तर कधी Retweet ही केले जाते. पण आता तुम्हाला Twitter च्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. ते म्हणजे Twitter Spaces च्या माध्यमातून.

Twitter चे हे ऑडिओ बेस्ड फीचर आता सर्व युजर्ससाठी आलं आहे. त्याला 600 पेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्या अकाउंटला हे फिचर दिले गेले आहे. Twitter Spaces या फीचरच्या माध्यमातून ऑडिओ रुम तयार करू शकता. तिथं लोकांना एकत्र जोडून संवादही साधता येऊ शकेल. यामध्ये एक होस्टही असेल तो स्वत: स्पीकर्स निश्चित करेल. याशिवाय तुम्ही अनेकांचा संवाद ऐकू शकाल. जर गरज पडल्यास तुम्ही रिक्वेस्ट देऊन स्पीकरही बनू शकता. Twitter Spaces सह कंपनी आता काही प्रयोग करू इच्छित आहे. जे Twitter Spaces होस्ट करत आहेत. ते स्पेसमध्ये एंटर करण्यासाठी पैशांची मागणीही करू शकतील. हा प्रकार म्हणजे एखाद्या चित्रपटासाठी थिएटरमध्ये घुसण्यासारखाच आहे. तिथंही पैसे द्यावे लागतात अन् इथंही द्यावे लागतील.

ट्विटरच्या या खास फिचरचा फायदा अनेकांना होणार आहे. Twitter Spaces च्या या नव्या फीचरचे नाव Ticked Spaces असे असेल. या अंतर्गत क्रिएटर्स आपल्या स्पेसमध्ये लोकांना एंटर करण्यासाठी काही रक्कम मागू शकतात. त्या तिकिटाचे मूल्य त्यांना द्यावे लागणार आहे. अशाप्रकारे ट्विटरकडून कमावण्याची संधी मिळू शकणार आहे.